अंधेरीतील कामगार रुग्णालयाला आग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Dec-2018
Total Views |



 
 
 
मुंबई : अंधेरी येथील कामगार रुग्णालयात आग लागली आहे. या आगीतून रुग्णांच्या बचावकार्या दरम्यान एकाचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात एकूण १५ रुग्ण अडकले आहेत. त्यांना रुग्णालयातून बाहेर काढण्याचे काम युद्धुपातळीवर सुरु आहे. कामगार रुग्णालयाजवळच्या पालिका आणि खासगी रुग्णालयांना याबाबत सतर्क करण्यात आले आहे.
 
अंधेरीच्या मरोळ भागात हे कामगार रुग्णालय आहे. सोमवारी संध्याकाळी चारच्या सुमारास कामगार रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावर आग लागली. सुमारे ४ वाजून ४५ मिनिटांनी या आगीबाबत अग्निशमन दलास माहिती देण्यात आली. त्यानंतर ७ बंब, रेस्क्यू व्हॅन, आणि इतर आवश्यक सामग्रीसह तातडीने अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@