मराठी प्रतिष्ठानच्या ‘आई’ पुरस्काराचे 21 ला वितरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Dec-2018
Total Views |

15 महिलांची करण्यात आली निवड, मान्यवरांची उपस्थिती

जळगाव : 
 
ज्या महिलांनी अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये आपल्या पाल्यांना उच्च पदावर पोहचविले अशा महिलांना येथील मराठी प्रतिष्ठानतर्फे स्व.सुनिताताई जगन्नाथ वाणी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘आई’ पुरस्कार देण्यात येणार आहे. हा वितरण सोहळा 21 रोजी संध्याकाळी 6 वाजता सागर पार्क येथे होणार आहे.
 
यासाठी आलेल्या प्रस्तावातून 15 महिलांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.प्रख्यात हॉटेल व्यवसायी डॉ. विठ्ठल कामत, माजी मंत्री सुरेशदादा जैन, माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी कुलगुरु डॉ. के. बी. पाटील, शेफ विष्णू मनोहर, सुबोध चौधरी, प्राजक्ता पै शहापूरकर या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
 
कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अ‍ॅड. जमील देशपांडे आणि सचिव विजय वाणी यांनी केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@