सामाजिक सेवाकार्यासह प्रामाणिक, पारदर्शी व्यवहार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Dec-2018
Total Views |

शेंदुर्णीची राणी लक्ष्मीबाई महिला बिगर ग्रामीण पतपेढी’ देतेय सबलीकरणारणाचे धडे


 
 
शेंदुर्णी ता.जामनेर : 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवाकार्यात सक्रिय कार्यकर्त्याच्या पुढाकाराने आणि त्यांच्या परिवारातील सुजाण, कष्टाळू माता महिलांच्या सहभागाने महिलांच्या उत्कर्षासाठी आणि सबलीकरणासाठी येथे 1992 पासून राणी लक्ष्मीबाई महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतपेढी पतसंस्था कार्यरत आहे.तालुका हे तिचे कार्यक्षेत्र आहे.1991 मध्ये तिची नोंदणी झाली. 92 मध्ये औपचारिक उद्घाटन जळगावच्या केशवस्मृती सेवा संस्थासमूहाचे अध्वर्यू , संघाचे ज्येष्ठ कार्यकत मातृहृदयी समाजसेवी स्व. अविनाश आचार्य आणि तत्कालीन जामनेरचे सरपंच गिरीशभाऊ महाजन यांच्या हस्ते झाले. 
 
 
सुरुवातीला संस्था बाजारपेठेत रमेश विसपुते यांच्या घरात कार्यरत होती. पुढे ती वाडी दरवाजा चौकातील दत्तमंदिराजवळच्या जुन्या दुमजली इमारतीत ही संस्था कार्यरत झाली. कारभार व क्षमता वाढत गेल्याने 2001 मध्ये ती विकत घेण्यात आली.रजूंचे राक्षसी पद्धतीने आर्थिक शोषण करणार्‍यांना, अवैध सावकारीला आळा घालण्याचे महत्कार्य संस्थेने केले आहे. काटकसर आणि बचतीचे महत्त्वही गृहिणी वर्गात बिंबवण्याचे सहजसुंदर कामही पतसंस्थेने लिलया केले आहे.संस्थेच्या पहिल्या व विद्यमान अध्यक्षा आहेत, सौ.शोभाताई उत्तमराव थोरात आणि उपाध्यक्षा आहेत सौ.साधना फासे ,मध्यंतरी सौ.रेखा प्रकाश झंवर या 15 वर्ष अध्यक्षा होत्या. संस्थेच्या वार्षिक सभेला हजारावर महिला सदस्यांची उपस्थिती व सहभाग थक्क करणारा ठरतो. कार्यकारी संचालक आहेत रवींद्र सूर्यवंशी, त्यांच्या मदतीला 14 सहकारी वर्ग आणि अल्पबचत अभिकर्ते आहेत 9. त्यात 2 महिला आहेत.
 
 
मार्गदर्शकाच्या भूमिकेत उत्तर राघो थोरात, प्रकाश राजमल झंवर आणि अशोक औटे, वामन फासे हे तळमळीचे,दूरद्रष्टे कार्यकर्ते आहेत.31 मार्च 2018 या आर्थिक वर्षाअखेरची प्रगतीदर्शक आकडेवारी अशी, संस्थेच्या 3537 महिला सभासद, राखीव निधी-88 लाख 49 हजार 972 रु., ठेवी- 25 कोटी 89 लाख 71 हजार रु., गरजू महिला सभासदांना 17 कोटी 17 लाख 62 हजार 795 रु. कर्ज वाटप (जामीन कर्ज वितरण मर्यादा-50 हजार रु. आणि तारण कर्ज मर्यादा-5 लाख रु.) संस्थेची सांपत्तिक व स्थैर्याची स्थिती हे संस्थेच्या गुंणवणुकीवर अवलंबून असते. संस्थेने योग्य ठिकाणी 11 कोटी 63 लाख 42 हजार 986 रु.ची गुंतवणूक करीत 61 लाख 26 हजार 108रु. नफा मिळविला आहे. नफ्याची वाटणी सहकार कायद्याचा नियमाप्रमाणे करुन 15 टक्के लाभांश दिला आहे.
 
 
सध्याच्या वास्तूसमोरच नवीन भव्य वास्तू आर्थिक वर्ष, 31 मार्चअखेर पूर्ण होणार आहे. तळमजल्याला 6 गाळे, पहिल्या मजल्यावर पतसंस्थेचे कार्यालय, विविध कक्ष आणि दुसर्‍या मजल्यावर बहुउद्देशीय अद्ययावत सभागृह अशी तिची रचना आहे.
दैनंदिन जबाबदार्‍या पार पाडणार्‍या गृहिणी अर्थात व्यवहारकुशल व शांत, विनम्र आणि मेहनती, अभ्यासू संचालक आणि विश्वासू 14 सहकारी संस्थेतील 9 सहकारी (दैनंदिन बचत ठेव प्रतिनिधी) अतिशय तळमळीने, पारिवारिक भावनेने संस्थेसाठी झटत आहेत त्याचबरोबर सामाजिक सेवेचा वसा आणि वारसाही अखंड चालवत आहेत.माता-भगिनींनी संस्थेच्या सेवांचा लाभ करुन घ्यावा आणि उत्कर्ष साधावा, कर्जदारांनी कर्जफेड नियमित करावी, अशी संस्थाचालकांची अपेक्षा आहे.
(संपर्क-उत्तम राघो थोरात-9657904971 )
चिलगावचा बंधारा ठरतोय संजीवनी
 
जामनेर हा तालुका तसा दुष्काळी, शेती आणि शेतकरी हा तालुक्याच्या अर्थकारणाचा कणा आहे, हे लक्षात घेत पतपेढीने सामाजिक व राष्ट्रभक्तीच्या भावनेेने शेंदुर्णीपासून 3 कि.मी. अंतरावरील चिलगाव येथे 7-8 वर्षापूर्वी बंधारा बांधला. यंदा पाऊस कमी झाल्याचे चिंताजनक स्थिती असली तरी या बंधार्‍यातील पाणी साठ्याने वाढलेला जलस्तर लक्षात घेता पाणी टंचाईची तीव्रता काही महिने तरी कमी करण्यात पतपेढीला यश आले आहे. पशुधनाची तहान भागण्यासाठी धनगरगल्लीत हौद बांधण्याचेही पतपेढीचे नियोजन आहे.
अजोड सामाजिक कार्य
 
गणेशोत्सव, दुर्गोत्सवात उत्तम कार्य करणार्‍या मंडळांना आर्थिक सहकार्य , आषाढी एकादशीच्या यात्रेत येथे येणार्‍या दिंड्यांमधील सुमारे 500 वारकर्‍यांना फराळ दिला जातो. पतसंस्थेची 2011 पासून रुग्णवाहिका आहे. डिझेल व किरकोळ देखभाल खर्चातील या सेवेचा शेकडो रुग्णांना लाभ झालेला आहे. मेणगावच्या जि.प.शाळा संरक्षकभिंतीलगत 240 वॄक्ष लावत पतसंस्थेने ते ठिबकने जगविले आहेत.
@@AUTHORINFO_V1@@