The task of paying human debt to the community is appreciated

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Dec-2018
Total Views |

आ.भोळे यांचे गौरवोद्गार : मौलाना आझाद आदर्श पुरस्काराने 46 मान्यवरांचा गौरव

जळगाव : 
 
आपण समाजाचं देणं लागतो. समाजासाठी जे चांगले काम करतात, त्यांचा सन्मान करणे म्हणजे त्यांना कामाची पावती देणे आहे. समाजाने तुमची दखल घेतल्याने तुमच्यावर असलेली जबाबदारी वाढली असून आणखी जोमाने कार्य करायला हवे. मानव समाजाचं ऋण फेडण्याचे तुम्ही करीत असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार आ.सुरेश भोळे यांनी काढले.
 
 
जिल्ह्यातील विविध क्षेत्रात काम करणार्‍या कर्तृत्त्ववान व्यक्तींचा रविवार, 16 रोजी अल्पबचत भवन येथे मौलाना आझाद अल्पसंख्याक समाज विकास फाउंडेशनतर्फे मौलाना आझाद आदर्श पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
 
 
सन्मान सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून आ.सुरेश भोळे, जि.प.सदस्या पल्लवी देशमुख, सतीश देशमुख, सचिन सोमवंशी, पं.स.चे उपसभापती कमलाकर पाटील, मजिद जकेरिया, फारुख शेख, शिवव्याख्याते संकेत पाटील, भावना शिरसेकर, फाउंडेशनचे अध्यक्ष फिरोज शेख, क्रीडा शिक्षक प्रवीण पाटील, सलीम इनामदार आदी उपस्थित होते.
 
 
आ.भोळे म्हणाले की, कोणत्याही ठिकाणी शासन, प्रशासन कमी पडत असल्यास आपल्यासारखे लोक पुढाकार घेतात. परिवाराच्या सहकार्याशिवाय चांगले कार्य होवू शकत नाही. स्वतःसाठी सर्वच जगतात, परंतु समाजासाठी जगणारे फार कमी असतात.
 
चांगले कार्य करताना कोण काय म्हणेल याचा विचार करू नका, स्वतःच्या मनाचे समाधान करण्याचा प्रयत्न करा. समाजासाठी काम करणे ही फार मोठी गोष्ट आहे, असे सांगून येणार्‍या उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासू नये यासाठी आतापासूनच पाणी जपून वापरण्याचे आवाहन त्यांनी केले.
 
 
शिवव्याख्याते संकेत पाटील यांनी, हिरे - मोत्यांचे मोल केवळ जोहरीच करू शकतो. जे तुम्हाला पागल म्हणतात, त्यांना गर्वाने सांगा की, मी पागल आहे. हे कवितेच्या माध्यमातून त्यांनी पटवून दिले. तसेच समाजसेवेचा वेडेपणा प्रत्येकाच्या मनाला भिडला तर जगात कुणीही दुःखी राहणार नाही, असेही ते म्हणाले.
 
 
सूत्रसंचालन भावना चौधरी, प्रास्ताविक प्रवीण पाटील यांनी तर आभार फिरोज शेख यांनी मानले.
यशस्वीतेसाठी अतुल चौधरी, किशोर सपकाळे, युवराज झाल्टे, गणेश जोशी, सुरेश पाटील, साजिद शेख यांनी सहकार्य केले.
यांचा झाला सन्मान
 
 
मन्यार सै. असलम सै. रसूल, चेतन वाणी, गिरीश नेहेते, बळीराम दुलगज, प्रशांतराज तायडे, सैय्यद अरशद मुमताज अली, किरण पाटील, समीर शेख, मिर्झा इकबाल बेग उस्मान बेग, समीर घोडेस्वार, मिर्झा वसीम आफताब बेग, वैशाली पाटील, राजमोहम्मद खान शिकलगर, नुरुद्दीन गयासोद्दीन मुल्लाजी, ज्योती निंभोरे, पोलीस कर्मचारी अक्रम याकूब शेख, रेखा पाटील, पूनम खैरनार, शुभांगी बिर्‍हाडे, वंदना पाटील, ज्ञानेश्वर पाटील, राजेंद्र ठाकूर, जगदीश सपकाळे, चंद्रकांत कोळी, सविता बोरसे, विजय सैतवाल, विलास नारखेडे, पितांबर भावसार, राहुल सूर्यवंशी, विद्या सोनार, भावना चौधरी, व्ही.आर.पाटील, महेंद्र पाटील, भावना शिर्सेकर, योगेश भालेराव, भारती काळे, पोलीस कर्मचारी बशीर गुलाब तडवी, प्रवीण धनगर, डॉ.श्रद्धा माळी, स्वाती पाटील, रुपाली वाघ, प्रतीक्षा पाटील, उज्वला वर्मा, केतकी गोहिल, अनिल वर्मा. त्याचप्रमाणे स्व.विठ्ठल पाटील यांचा मरणोत्तर सन्मान करण्यात आला.
@@AUTHORINFO_V1@@