मला अडचणीत आणण्यासाठी देशाच्या सुरक्षेशी खेळ का? ; पंतप्रधान मोदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Dec-2018
Total Views |


 


लखनऊ : मोदींना अडचणीत आणण्यासाठी देशाच्या सुरक्षेशी खेळ का?, असा सवाल करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. तसेच कर्जमाफीच्या नावावर काँग्रेस शेतकऱ्यांना खोटे बोलत आहे, अशी टीकाही त्यांनी केली. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचा बालेकिल्ला असलेल्या रायबरेलीत आयोजित सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते.

 

संरक्षण खरेदी व्यवहारात आतापर्यंत इटालियन व्यावसायिक ओटाव्हियो क्वात्रोचीचा सहभाग असायचा. काँग्रेसचा हा इतिहास आहे. पण आम्ही या करारात ना क्वात्रोची मामाचा सहभाग करून घेतला, ना मिशेल काकाचा. राफेल डीलमध्ये या दोन्ही काका-मामाचा सहभाग नसल्यानेच काँग्रेसचा तीळपापड झाला आहे.” अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी काँग्रेसवर हल्ला चढवला. “कर्नाटकमध्ये सरकार आल्यानंतर दहा दिवसात शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले होत. पण, सहा महिने लोटले तरी एक हजार शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीच्या नावावर काँग्रेस शेतकऱ्यांना खोटे बोलत आहे.” अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

 

“मोदींना अडचणीत आणण्यासाठी देशाच्या सुरक्षेशी खेळ का? अशी जळजळीत सवाल मोदींनी या सभेत केला. “भारतीय लष्कर सक्षम होऊ नये म्हणून प्रयत्न करणाऱ्यांना काँग्रेसची साथ आहे. अशा लोकांना कोणत्या देशांचा पाठिंबा मिळत आहे, हे सुद्धा देश पाहतोय. भाषणे इथे होतात आणि टाळ्या पाकिस्तानात वाजवल्या जातात. काही लोक संरक्षण मंत्रालय आणि संरक्षण मंत्र्यांना खोटे ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत. कोर्टालाही खोटे पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र सत्य लपून राहत नाही आणि कितीही खोटे बोलले तरी ते खरे ठरत नाही.” असे पंतप्रधान मोदींनी सांगितले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@