जानेवारीत म्हाडाच्या ५,००० घरांची सोडत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Dec-2018
Total Views |



मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) घटक असलेल्या कोकण मंडळामार्फत काढण्यात येणार्‍या ५,००० घरांची लॉटरी जानेवारी २०१९मध्ये निघणार असल्याची माहिती राज्याचे गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांनी रविवारी दिली. म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे जाहीर केलेल्या १ हजार ३८४ परवडणार्‍या सदनिकांच्या घरांची सोडत म्हाडा भवनात प्रकाश महेता यांच्या हस्ते काढण्यात आली या वेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे उपस्थित होते.

 

आगामी कोकण मंडळाच्या सोडतीत मुंबई महानगर क्षेत्रातील ठाणे, कल्याण, रायगड आदी ठिकाणी ५ हजार घरे असणार आहेत. तसेच जानेवारीतच म्हाडाच्या पंतप्रधान आवास योजनेतील ५ लाख घरांच्या प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शासनाकडून मिळणारे अडीच लाखांचे अनुदान म्हाडा मार्फत मिळणार आहे. तसेट दोन टक्के कोट्यतील शासनामार्फत मिळणारे घर आता म्हाडातर्फे मिळणार आसल्याचे महेता यांनी सांगितले. या सोडतीच्या कार्यक्रमाला म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत, सभापती मधु चव्हाण, विनोद घोसाळकर, मुख्य अधिकारी दीपेंद्रसिंह खुशवाहा उपस्थित होते.

 

पुढील वर्षी मुंबईकरांसाठी २,००० घरे

 

पुढील वर्षी म्हाडाच्या मुंबई मंडळालाच्या सुरू असलेल्या २,००० घरांची सोडत निघणार आहे. ही सर्व घरे मुंबई आणि मुंबई उपनगरात असणार आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

 

१० वर्षांनी नशीब खुलले !

 

म्हाडा कर्मचारी असलेले योगश महाजन यांनी सांगितले की, “मी गेल्या १० वर्षांपासून अर्ज करत असून या वेळी मला वडाळ्यातील घर लागले आहे. म्हाडाचे आभारच पण ज्यांना या लॉटरीत घर नाही लागले त्यांनी नाराज न होता पुन्हा प्रयत्न केला पाहिजे.

 

एकाच कुटुंबतील तिघांना घरे

 

या सोडतीत रमीझ तडवी यानी अंटोप हिल येथील घरासाठी अर्ज केला आणि त्यांच्या आई-वडील दोघांनी महावीर नगर कांदिवली येते अर्ज केला या लॉटरी तिघांनाही घरें लागली आहेत यातील एक घर परत करणार असल्याचे तडवी यांनी सांगितले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@