लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Dec-2018
Total Views |


 


“तो आला, त्याने पाहिलं, आणि जिंकून घेतलं सार...” ही ओळ जेव्हा कधी कानावर पडते, तेव्हा एकच चेहरा डोळ्यासमोर येतो तो म्हणजे आपल्या लाडक्या 'लक्ष्या'चा... म्हणजेच मराठी विनोदाचा सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे यांचा. जगाला खळखळून हसवणाऱ्या या अवलियाने १६ डिसेंबर २००४ रोजी अनपेक्षित एक्झिट घेतली.


 
 

विनोदाचे अजून टायमिंग आणि कामाबद्दलची श्रद्धा असलेला असा हा कलाकार. चित्रपटांसोबत रंगमंच गाजवणारा एक अवलिया अशी त्यांची प्रचिती अजूनही आहे.

 

 
 

लहानपणापासूनच अभिनयाचे वेड त्यांच्या अंगी होते. त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवामधील सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असायचा. त्यांनी आंतरशालेय आणि आंतरमहाविद्यालयीन अभिनय स्पर्धांमध्ये पारितोषिके पटकावली होते.

 

 
 

लक्ष्मीकांतने मुंबई मराठी साहित्य संघाकडून सोबत व्यावसायिक नाट्यसृष्टीत पदार्पण केले. १९८३-८४ मध्ये त्यांनी पुरुषोत्तम बेर्डे यांच्या ‘टूर टूर’ ह्या नाटकामधे प्रमुख भूमिका साकारली आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवली. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. १९८५ मध्ये लेक चालली सासरला’ या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण केले.

 


 
 

खरी ओळख त्यांना मिळाली ती म्हणजे १९८५मध्येच आलेल्या ‘धूमधडाका’ या चित्रपटाने. या चित्रपटानंतर लक्ष्मीकांत बेर्डे यांचे पर्व सुरु झाले.

 

 
 

महेश कोठारे, अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर यांच्या सोबत जमलेले ट्युनिंग मराठी चित्रपट क्षेत्राला एका उंचीवर घेऊन गेले.

 

 
 

'अशी ही बनवा बनवी', ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’, ‘एका पेक्षा एक’, ‘थरथराट’, ‘धडाकेबाज’, ‘झपाटलेला’ आणि ‘हमाल दे धमाल’ हे त्यांचे चित्रपट ब्लॉकब्लस्टर ठरले.

 

 
 

७० आणि ८०च्या दशकात मराठी चित्रपटांपासून दूर जाणारा मराठी प्रेक्षक पुन्हा मराठीकडे वळला. त्यामध्ये त्यांच्या चित्रपटांचा मोठा वाटा होता.

 
 
 

मराठीसोबतच अमराठी प्रेक्षकांनी ही त्यांची दाखल घेतली आणि १९८९मध्ये त्यांना सुरज बडजातीया यांच्या 'मैंने प्यार किया' या चित्रपटातून त्यांनी हिंदीमध्ये पदार्पण केले. हिंदी आणि मराठी चित्रपट तसेच मराठी रंगमंच यावर एकाचवेळी त्यांनी अधिराज्य केले.

 

 
 

अशा या "विनोदाच्या राजाला" महा MTB कडून १४व्या स्मृतिदिनानिमित्त मानवंदना...

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@