अभिनेते विनोद खन्ना यांच्या पत्नीचे निधन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Dec-2018
Total Views |


 

मुंबई : दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांच्या पत्नी व अभिनेता अक्षय खन्ना यांची आई गीताजंली खन्ना यांचे वयाच्या ७० व्या वर्षी निधन झाले. अलिबागच्या मांडवा येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रविवारी सकाळी त्यांचे पार्थिव जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. यावेळी अभिनेता अक्षय खन्ना व राहुल खन्ना ही दोन्ही मुले उपस्थित होते. गीतांजली यांच्या पार्थिवावर मांडवा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. एप्रिल २०१७मध्ये विनोद खन्ना यांचे निधन झाले होते.

 

गितांजली आणि विनोद खन्ना यांचा १९७१मध्ये विवाह झाला. पण, विनोद खन्ना यांनी सिनेमा, कुटुंब सोडत ओशोच्या सेवेसाठी गेले. त्यानंतर त्यांनी कुटुंबापासून फारकत घेतली. त्यानंतर गितांजली यांनी खन्ना यांना घटस्फोट दिला. घटस्फोटानंतर पाच वर्षांनी विनोद खन्ना मुंबईला परतले आणि त्यांनी नव्याने आयुष्य सुरू केले. १९९०मध्ये त्यांनी कवितासोबत दुसरे लग्न केले. कवितापासून विनोद खन्ना यांना साक्षी व श्रद्धा ही अशी दोन मुले झाली. अर्थात पहिल्या पत्नीपासून घटस्फोट होऊनही विनोद यांनी पित्याचे कर्तव्य निभावले. अक्षय खन्नाला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्यासाठी त्यांनी हिमालय पुत्र हा चित्रपट बनवला. राहुलचे करिअरही त्यांनी मार्गी लावले. २७ एप्रिल २०१७ रोजी विनोद खन्ना यांनी अखेरचा श्वास घेतला.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@