अंगणवाड्यांमध्ये घोटाळा ८ लाख बोगस लाभार्थी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Dec-2018
Total Views |



 
 
 
नवी दिल्ली : महाराष्ट्रात एक लाखांहून अधिक अंगणवाड्या आहेत. या अंगणवाड्यांमध्ये कमीत कमी ८ लाख बोगस लाभार्थी असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. महाराष्ट्रात अंगणवाड्यांचे एकूण ६१ लाख लाभार्थी आहेत. परंतु यापैकी ८ लाख लाभार्थी हे बोगस असल्याची माहिती समोर आली आहे. लाभार्थी आधारशी जोडलेले असल्याने हे सत्य उघडकीस आले. 
 

केंद्र सरकार प्रत्येक मुलासाठी दिवसाला ४.८ रुपयांचे अनुदान देते. तर राज्य सरकारकडून ३.२ रुपयांचे अनुदान देण्यात येते. परंतु हा प्रकार उघडकीस आल्याने देशभरातील नोंदणीकृत अंगणवाड्यांमधील बोगस लाभार्थ्यांची ओळख पटवून त्यांना हटविण्याचे काम सध्या सुरु आहे. अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. आसामध्ये सरकारने केलेल्या तपासणीत १४ लाख बोगस लाभार्थी सापडले होते. या प्रकारानंतर अंगणवाडी लाभार्थ्यांची सत्यता पडताळणीची मोहीम सरकारने हाती घेतली.

 

उत्तर प्रदेशमध्ये अंगणवाडीचे १४ लाख बोगस लाभार्थी सापडले आहेत. तसेच अंगणवाड्यांमधील मुलांच्या खाद्य पुरवठ्यातही अनेक त्रुटी असल्याचे आढळून आले आहे. महाराष्ट्र सरकारने या लाभार्थ्यांची तपासणी करावी. अशा सूचना मंत्रालयाकडून देण्यात आल्या आहेत. नोंदणीकृत अंगणवाड्यांमधील एक कोटींपेक्षा अधिक बोगस लाभार्थ्यांना हटविण्यात आले होते. अशी माहिती या वर्षी सप्टेंबर महिन्यात मनेका गांधी यांनी दिली होती.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@