वरणगाव शहरात पाणीपुरवठा विस्कळीत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Dec-2018
Total Views |

 
 
वरणगाव : 
 
गेल्या काही दिवसांपासून तापी नदीतील पाण्याची पातळी कमी झाली आहे. यामुळे तापी नदीतील वरणगाव शहराला पाणीपुरवठा करणार्‍या विहिरीवरील बॉल अडकल्याने मंगळवारपासून शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. परंतु धरणातील पाण्याचे आवर्तन आल्याने दिलासा मिळाला आहे.
 
 
गेल्या काही दिवसांपासून गेल्या तापी नदीतील पाण्याची पातळी कमी होत आहे. यामुळे शहराला पाणीपुरवठा करणार्‍या जॅकवेलवरील इनलेट विहिरीतील फुटबॉल गाळामध्ये अडकल्याने जॅकवेलमधील विहिरीत पाणी येत नव्हते.
 
 
यामुळे सिद्धेश्वरनगर येथील जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा होत नसल्याने मंगळवारपासून जलशुद्धीकरण केंद्र बंद पडले आहे. तीन दिवस पाणीपुरवठा न झाल्याने शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले असून नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
 
 
पालिकेने गाळात रुतलेला फुटबॉल काढण्यासाठी अथक प्रयत्न केले. या ठिकाणी नदीपात्रातील इंटॅक विविध 2 फुटबॉल आहेत. पैकी वरील फुटबॉल पाणीपातळी कमी झाल्याने उघड्यावरती दिसत होता तर खाली फुटबॉल हा आठ फूट खोल गाळामध्ये रुतला होता.
 
या ठिकाणी कर्मचार्‍यांनी पाण्याच्या आत जाऊन फुटबॉलच्या आजूबाजूला असलेले शंख शिंपले व माती काढून मोकळा केला. यासाठी जीसीबीदेखील आले.
 
परंतु गाळाचे प्रमाण जास्त असल्याने जीसीबी फुटबॉलपर्यंत पोहोचू शकले नाही. आज रात्री धरणातून पाण्याचे आवर्तन सोडल्याने पुन्हा जलपातळी वाढली आणि शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
@@AUTHORINFO_V1@@