विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मानसिक आजार, उपचारांबद्दल मार्गदर्शन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Dec-2018
Total Views |

 
 
जळगाव : 
 
विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 13 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्यातर्फे जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मानसिक आजारांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
 
 
जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉ. विजय मुठे, प्रतिभा तिवाने, ज्योती पाटील यांनी ताण-तणावाची लक्षणे, मानसिक आजारांची लक्षणे, उदासीनता, व्यसनाधिनता हे आजार आपल्याला कशा पद्धतीने होतात, याबद्दल माहिती दिली. विद्यार्थ्यांनी या सर्व गोष्टी नियमितपणे करण्याचा निर्धार केला.
 
 
मान्यवरांचे स्वागत निलश्री सहजे यांनी केले. सूत्रसंचालन विद्यार्थिनी परी पवार, कोमल ओझा यांनी केले. शाळेतील शिक्षक व विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते.
 
 
यशस्वितेसाठी प्राचार्य ज्ञानेश्वर पाटील यांचे मार्गदर्शन व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
@@AUTHORINFO_V1@@