वाचन कट्ट्यास जिल्हाधिकार्‍यांची भेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Dec-2018
Total Views |

जळगाव : 
 
डॉ. अविनाश आचार्य विद्यालयात वाचन कट्ट्यास 14 रोजी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी भेट दिली. विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना त्यांनी सोप्या भाषेत उत्तरे दिली.
 
 
जिल्हाधिकारी यांनी वाचनाने होणारे फायदे, लहानपणीचा शाळेतील अनुभव, मित्र-मैत्रिणी सोबत केलेली गंमत-जंमत, इ. गोष्टींचा उलगडा त्यांनी केला. श्यामची आई हे पुस्तक मनाला कसे भावते, हेही त्यांनी सांगितले.
 
 
वाचन केल्याने आपली शब्द संपत्ती वाढते. आपला शब्दसंग्रह चांगला होतो. तसेच नियमित वाचन केल्याने आपल्या ज्ञानात भर पडते, असेही त्यांनी सांगितले.
 
 
याप्रसंगी शालेय समिती अध्यक्षा हेमाताई अमळकर, मुख्याध्यापिका योगिता शिंपी यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन सचिन गायकवाड यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
@@AUTHORINFO_V1@@