रोटरी प्रीमियर लीगचे पहिले पाच सामने रंगले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Dec-2018
Total Views |

देणगीदारांचा सत्कार

 
जळगाव : 
 
येथील रोटरी क्लब जळगाव वेस्टतर्फे सागर पार्क मैदानावर रोटरी प्रीमियर लीग (आरपीएल)च्या पहिल्या पाच सामन्यांनी स्पर्धेत रंगत आणली आहे.
 
पहिल्या सामन्यात पाचोरा नाईट रायडर्स संघाने 8 षटकात 5 गडी गमवत 73 धावा केल्या तर चोपडा सुपर किलर्स संघाने 8 षटकात 6 गडी गमवत 66 धावा केल्या. 8 धावांनी पाचोरा येथील रोटरी क्लबच्या संघाने विजय मिळवला.
 
 
दुसर्‍या सामन्यात वेस्ट वॉरियर्स संघाने प्रथम फलंदाजी करीत 85 धावा केल्यात तर वेस्ट स्टायकर्स संघाने 7.3 षटकातच 86 धावा करून विजय मिळवला. त्यात हितेश पटेल यांच्या 52 धावांचा समावेश होता.
 
 
तिसर्‍या सामन्यात भुसावळ रेलसिटी संघाने प्रथम फलंदाजी करत 4 गडी गमवून 60 धावा केल्या, तर गोल्डसिटी लायन्स संघाने 6.2 षटकातच 8 विकेटने हा सामना जिंकला. विनोद जैन यांनी सामनावीराचा बहुमान प्राप्त केला.
 
 
चौथ्या सामन्यात चोपडा सुपर किलर्स संघाने प्रथम फलंदाजी करीत 5 गडी बाद 100 धावा केल्या. त्यात रुपेश पाटील यांनी 8 चेंडूत 35 धावा काढल्या. वेस्ट चॅलेंजर्स संघाने 8 विकेटने हा सामना जिंकला. त्यात सचिन वर्मा यांनी 8 चेंडूत 36 धावा ठोकल्या.
 
 
 
पाचव्या सामन्यात आरसी डॉर्क हॉसेर्स संघाने 29 धावा केल्या. ईस्ट ग्लॅडिएटर्स संघाने 9 विकेटने हा सामना जिंकला. त्यात 6 चेंडूत 28 धावा काढणार्‍या नुरुद्दीन राजकोटवाला यांना सामनावीराचा सन्मान देण्यात आला.
 
  
आरपीएल या सामाजिक उपक्रमांच्या मदतीसाठी आयोजित स्पर्धेसाठी सहकार्य करणार्‍या प्रा. नंदलाल गादिया, शैलेंद्र महाजन, धवल चिरमाडे, परेश सोमाणी, आदर्श कोठारी, संगीता पाटील, डॉ.सुशीलकुमार राणे, हिरालाल दमाणी, निलेश अग्रवाल, किशोर ढाके, डॉ. भूषण सोमाणी, नितीन रेदासनी आदींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
 
 
व्यासपीठावर रोटरी वेस्टचे माजी अध्यक्ष रमण जाजू, संदीप काबरा, सुनील अग्रवाल, अ‍ॅड. प्रमोद पाटील, योगेश भोळे, अ‍ॅड. सुरज जहांगीर, कुमार वाणी हे होते. स्पर्धेला भंगाळे गोल्ड, फोकस ह्युंडाई व स्माईल निडस् यांचे सहकार्य लाभत आहे.
15 रोजी सकाळी 8 वाजेपासून उर्वरित सामन्यांना सुरुवात होईल.
@@AUTHORINFO_V1@@