शालेय पोषण आहारात फेरफार करणार्‍या ठेकेदारावर कारवाई करा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Dec-2018
Total Views |

ना.रावल यांची अधिकार्‍यांना तंबी, शाळांमधील आहाराचा तपासला दर्जा


नंदुरबार : 
 
मुलांच्या शालेय पोषण आहारातील खाद्यपदार्थांची फेरफार करणार्‍या ठेकेदारांवर तातडीने कडक कारवाई करण्याचे आदेश ना. जयकुमार रावल यांनी नंदुरबारच्या शिक्षण अधिकार्‍यांना नुकतेच दिले आहेत.
 
पालकमंत्री जयकुमार रावल हे नंदुरबार जिल्ह्याच्या दौर्‍यावर असताना त्यांनी गुरुवारी अचानक धडगाव तालुक्यातील वडफळ्या गावातील नरेंद्र नवोदय छात्रालयाला भेट दिली. यावेळी शालेय पोषण आहारातील वेळापत्रकानुसार मुलांना जेवण मिळत आहे की नाही, याची पाहणी ना. रावल यांनी केली.
 
 
पोषण आहारातील खिचडी स्वतः खाऊन खाद्यपदार्थांचा दर्जाही तपासला. छात्रालयात खिचडी तर दिली जात होती, पण वेळापत्रकानुसार ऊसळ मात्र दिली गेली नव्हती.
 
 
याबद्दल ना. रावल यांनी नाराजी व्यक्त केली. विद्यार्थ्यांना पोषण आहार न देणार्‍या ठेकेदारावर कारवाई करण्याची तंबी ना.रावल यांनी शिक्षण अधिकार्‍यांना दिली.
 
 
शालेय पोषण आहाराची आदिवासी पाड्यांवरील शाळांमध्ये काय स्थिती आहे, हे जाणून घेण्यासाठी पालकमंत्र्यांनी अचानक धडगाव तालुक्यातील वडफळ्या गावातील नरेंद्र नवोदय छात्रालयाला भेट देऊन पाहणी केली. पालकमंत्र्यांनी अचानक दिलेल्या भेटीमुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
 
 
ना. जयकुमार रावल यांनी यावेळी स्थानिक पालक, नागरिकांशी संवादही साधला. पोषण आहारातील खिचडीही खाल्ली.
तसेच किचन, शाळेची पाहणी केली व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहाराबाबत विचारणाही केली.
@@AUTHORINFO_V1@@