सावदा न.पा.वर दिव्यांग सेनेचा धडक मोर्चा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Dec-2018
Total Views |


 
फैजपूर ता. यावल : 
 
दिव्यांग सेनेतर्फे विविध मागण्यांसाठी शुक्रवारी नगरपालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला. दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी मुख्याधिकारी सौरभ जोशी यांना दिव्यांग सेना जिल्हाध्यक्ष अक्षय महाजन यांच्या उपस्थितीत आणि सावदा शहराध्यक्ष विशाल कासार यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.
 
निवेदनात दिव्यांग बांधवांनी सावदा नगरपालिका हद्दीत राहत असलेल्या दिव्यांगांचा 5 टक्के निधी घरपट्टी, नळपट्टी व्यवसायासाठी दिव्यांगांना स्टॉल उपलब्ध करून देण्यात यावे, मूकबधिरांसाठी सांकेतिक भाषेत माहिती मिळावी, अंध बांधवांना ऑडिओ भाषेत माहिती मिळावी, दिव्यांग बांधवांचा प्रचार व प्रसार, जनजागृती करणे सावदा नगरपालिकेचे कर्तव्य आहे.
 
 
मूकबधिर, कर्णबधिर, अंध, अस्थिव्यंग यांना सावदा नगरपालिकाअंतर्गत असलेल्या सुविधा मिळण्याबाबत मागणी करण्यात आली. यावेळी सावदा पालिकेत मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी दिव्यांग सेना जिल्हाध्यक्ष अक्षय महाजन, धरणगाव शहराध्यक्ष नंदलाल कुलथे, फैजपूर शहर अध्यक्ष नितीन महाजन, उपाध्यक्ष नाना मोची, ललित वाघुळदे, सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हे, मुन्ना चौधरी, तेजस वंजारी, दीपक बारी, दिलीप जैन, महिला संघटक प्रमुख संगीता गडे, दिव्यांग सेना रावेर तालुकाध्यक्ष ब्रिजलाल पाटील, कार्याध्यक्ष महेश महाजन, सहकार्याध्यक्ष संजय बुवा, विजय बारी उपस्थित होते. अक्षय महाजन यांनी दिव्यांग बांधवांना स्वावलंबन कार्डबाबत मार्गदर्शन केले.
 
 
मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी 15 दिवसात दिव्यांगांचा कल्याणकारी निधी वाटप केला जाईल, असे आश्वासन दिले. मोर्चात धरणगाव, सावदा, फैजपूर, रावेर, केराळा येथील दिव्यांग सेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@