आ. चौधरी यांची रुग्णास वैद्यकीय मदत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Dec-2018
Total Views |

अमळनेर :
 
रुग्णांना उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत मिळावी, म्हणून आ.शिरीष चौधरी यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे सय्यद सलीम सय्यद चाँद रा. कसाल्ली मोहल्ला, अमळनेर यांना 75 हजारांची मदत मिळाली आहे.
 
 
आ. शिरीष चौधरी गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदतीचा हात देत असतात, हे सर्वांना ज्ञात आहेच. यांच्या पाठपुराव्याने रुग्णाला 75 हजार रु मदत मिळाली आहे.
 
 
सय्यद सलीम सय्यद चाँद हे सध्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. सय्यद सलीम सय्यद चाँद यांना वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याने आ. शिरीष चौधरी यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळावी, अशी शिफारस केली होती.
 
 
त्यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळाली आहे. समीर सय्यद यांना मंजुरीचे पत्र देताना आ. शिरीष चौधरी, गुलाम नबी, कुंदन पाटील, यावेळी उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@