चाळीसगाव पालिका मुख्य जलवाहिनीला लिकेज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Dec-2018
Total Views |


चाळीसगाव : 
 
शहराला पाणीपुरवठा करणार्‍या गिरणा धरणावरून आलेल्या नगरपरिषदेची मुख्य जलवाहिनीला मोठा लिकेज झाल्याने पाण्याचे पाट वाहत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यामुळे पुन्हा एकदा या पाईपलाईनच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
 
 
शुक्रवारी सकाळी ही बाब पालिका प्रशासनाच्या लक्षात आली. मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, विश्वास चव्हाण, पालिका पाणीपुरवठा अभियंता संजय अहिरे, कैलास आगोने, दीपक देशमुख यांच्यासह कर्मचारी यांनी लिकेज पाईपलाईन ठिकाणी धाव घेतली. धुळे बायपास चौकातून मालेगाव चौफुलीजवळ जगदीश आग्रवाल यांच्या नियोजित मंगल कार्यालयसमोर ही पाईपलाईन फुटली आहे.
 
36 तासात होणार दुरुस्ती
 
 
शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनीला शुक्रवारी सकाळी लिकेज झाल्याचे कळले. हा लिकेज पालिकेच्या जलवाहिनीला झालेला आतापर्यंतचा सर्वात मोठा लिकेज आहे.
 
 
त्यामुळे सर्व पाणीपुरवठा विभाग या दुरुस्तीसाठी कामाला लागला आहे. तरीही या दुरुस्तीसाठी 36 तास अवधी अपेक्षित आहे.
आशालता चव्हाण, नगराध्यक्षा
@@AUTHORINFO_V1@@