फेसबुकच्या ६८ लाख यूजर्सचे वैयक्तिक फोटो झाले सार्वजनिक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Dec-2018
Total Views |

 


 
 
 
नवी दिल्ली : फेसबुकच्या एका बगमुळे तबब्ल ६८ लाख फेसबुक यूजर्सचे वैयक्तिक फोटो सार्वजनिक झाले आहेत. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. फेसबुकने या प्रकरणी आपल्या यूजर्सची माफी मागितली आहे. तसेच यापुढे असे होणार नाही, असे आश्वासन फेसबुककडून यूजर्सना देण्यात आले आहे.
 

काही ऑनलाईन अॅप्सला यूजर्स आपल फेसबुक प्रोफाईल लिंक करतात. यूजर्सच्या फेसबुकवरील फोटोंचा अॅक्सेस हे अॅप मागते. यूजर्स हा अॅक्सेस या ऑनलाईन अॅप्सना सहज देतात. हा अॅक्सेस दिल्यावर या ऑनलाईन अॅप्सवर यूजर्सचे फोटो दिसतात. ज्या फोटोंना यूजरने फेसबुकवर सार्वजनिक केले आहे, पब्लिक सेटिंग दिली आहे. असेच फोटो यापूर्वी या ऑनलाईन अॅप्सवर दिसायचे. परंतु आता यूजर्सचे गोपनीय आणि वैयक्तिक फोटोही या अॅप्सवर दिसू लागले आहेत. तब्बल ६८ लाख फेसबुक यूजर्सचे वैयक्तिक फोटो सार्वजनिक झाल्यामुळे फेसबुकवर सर्व स्तरातून खडसून टीका करण्यात आली. फेसबुकने तातडीने आपली ही चूक सुधारली. यापुढे कोणत्याही फेसबुक यूजर्सचे वैयक्तिक फोटो या ऑनलाईन अॅप्सवर सार्वजनिक झाल्यास लगेचच त्या फेसबुक यूजरला यासंबंधीचे नोटिफिकेशन पाठविण्यात येईल.

 

यापुढे कोणत्याही ऑनलाईन अॅप्सशी आपले फेसबुक अकाऊंट लिंक करताना फेसबुक यूजर्सनी काळजी घ्यावी. तसेच अशाप्रकारच्या ऑनलाईन अॅप्सशी आपले फेसबुक अकाऊंट लिंक केल्यास काय संभाव्य धोका उद्भवू शकतो. यासंबंधीची माहिती फेसबुक नोटिफिकेशनद्वारे यूजरला दिली जाणार आहे. यापूर्वीही फेसबुकने आपल्या यूजर्सची वैयक्तिक माहिती सार्वजनिक केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी ५ लाख यूजर्सची वैयक्तिक माहिती फेसबुकने निवडणुकांसाठी वापरली असल्याचे स्पष्ट झाले होते.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@