गुंड प्रवृतीचा पत्ताकिंग शेखआरिफ( आऱ्या ) ला कायमस्वरूपी हद्दपार करण्याची शहरवासीयांची मागणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Dec-2018
Total Views |
फैजपूर ता यावल : 
 
 
येथील सतत उपद्रवी प्रवृत्तीचा गुंड पत्ताकिंग तथा पी आर पी चा अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष शेख आरिफ शेख उर्फ आऱ्या ने हिंदू मुस्लिम समाजातील जातीय सलोख्याला तडा गेला व हिंदुच्या धार्मिक भावना दुखावल्या असे वक्तव्य करून ते दिनांक 14 डिसेंबर ला शहरातील विविध व्हाट्सप ग्रुपवर व्हायरल करून शांततंय फैजपूर शहरात दंगल घडविण्याचा केलेल्या प्रयत्नाला मात्र हिंदू मुस्लिम शहर वासीयांनी शांतता संयम बाळगून शहराचा जातीय सलोखाचा आदर्श कायम राखला आहे .
 
 
शहरातील हिंदुसमाज्यातील नेते कार्यकर्ते यांनी या बाबी कमालीचा संयम ठेवत रात्री 9 वा पोलीस ठाण्यात भाजपा तालुकाध्यक्ष डॉ नरेंद्र कोल्हे यांनी तक्रार दाखल केली व सदर आरोपीला पोलिसानी तात्काळ अटक केली व पुढील कारवाई रात्री उशिरापर्यंत करण्यात आली असून आऱ्या विरुद्ध पोलिसात धार्मिक भावना दुखावने ,भडकावणे तसेच जातीयवादी शिवराळ व असभ्य वर्तन करणे , सायबर गुन्हा अनव्ये भादवी कलम क्र 295-ए,298,504,506, तक्रार नोंदवली आहे शहरवासीचा संयम व पोलिस अधिकारी वर्गाची सतर्कता मुळे कटू प्रसंग टळला आहे.
 
 
याप्रसंगी भाजपचे प्रदेश सदस्य भास्करराव चौधरी,माजी जिल्हा उपाध्यक्ष हिरभाऊ चौधरी, ता सरचिटणीस विलास चौधरी, भाजपा गट नेते मिलींद वाघूळदे, नगरसेवक हेमराज चौधरी, डॉ कुंदन फेगडे माजी तालुकाध्यक्ष नितीन राणे,माजी नगराध्यक्ष निलेश राणे,ता उपाध्यक्ष नितीन नेमाडे, रवींद्र होले ,शहराध्यक्ष संजय रल सरचिटणीस संजय सराफ, अनंता नेहेते, पप्पू चौधरी,चंद्रकांत भिरुड, मनोज होले,विजय कोल्हे,संदीप भारंबे,यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@