बोदवड ग्रामन्यायाधीश डी.एम.शिंदे पदारूढ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Dec-2018
Total Views |

बोदवड :
 
येथे दर आठवड्यात प्रत्येक बुधवारी सुरू असणार्‍या ग्राम न्यायालयाच्या ग्राम न्यायाधीशपदाचा पदभार नवनियुक्त न्यायाधीश डी. एम. शिंदे यांनी स्वीकारला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात त्यांनी आपले विचार मांडले.
 
 
ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत जलद व कमी खर्चात न्याय पोहोचविण्यासाठी शासन ग्राम न्यायालयाची संकल्पना राबवित आहे. त्याचा बोदवड तालुका व परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
 
 
 
यावेळी झालेल्या कार्यक्रमात न्यायाधीश डी. एम. शिंदे यांचे स्वागत बोदवड तालुका वकील संघाचे अध्यक्ष अंड. अर्जुन पाटील यांनी केले.
 
 
प्रस्तावना अ‍ॅड. अर्जून पाटील, सूत्रसंचालन अ‍ॅड. धनराज प्रजापती यांनी केले. यावेळी सचिव योगेश सिखवाल, दीपक झांबड, सुनील जाधव, विकास शर्मा, निलेश लढे, मीनल अग्रवाल, विजय मंगळकर, ईश्वर पाटील, अमोलसिंग परदेशी, राऊत, पवार, नरेश नारखेडे, पी.आर.मोझे, के. एस. इंगळे ही वकील मंडळी तसेच न्यायालयीन कर्मचारी वाणी, आमोदकार, बाविस्कर व पो. कॉ. शांताराम पाटील उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@