तळोद्यात आदिवासी सांस्कृतिक विकास भवनाचे भूमिपूजन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Dec-2018
Total Views |

आ. उदेसिंग पाडवी यांची उपस्थिती


 
तळोदा : 
 
आदिवासी संस्कृतीचे जतन व्हावे, आदिवासी लोककलेला व्यापक स्वरूप मिळावे, आदिवासींना त्यांना हक्काची जागा प्राप्त व्हावी याकरिता आदिवासी उपाययोजनेतून आदिवासी सांस्कृतिक भवन साकारले जाणार असून या कामाचे भूमिपूजन आ. उदेसिंग पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले.
 
 
आदिवासी समाजातील लोककला, सामूहिक लग्न, परंपरागत सण उत्सव, आणि त्यांच्यातील उपजत कलागुणांना व सांस्कृतिक कार्यक्रमांना चालना देण्याचा दृष्टीने आदिवासी भागांमध्ये जागा उपलब्ध नसते.
 
 
त्यामुळे त्यांच्यातील असलेले कौशल्य व इतर गुणांना वाव मिळत नाही. यासाठी आदिवासी उपाययोजनेतून सांस्कृतिक भवन योजनेअंतर्गत तळोदा शहरात आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या भगवान सीतारामनगर येथील जागेत, तर ग्रामीण भागात सोमावल बुद्रूक या गावी अशा तालुक्यांतील दोन ठिकाणी प्रत्येकी 1 कोटी रु. रकमेचे 2 आदिवासी सांस्कृतिक भवन उभारले जाणार आहे.
 
 
तालुक्यातून सांस्कृतिक भवन किंवा सांस्कृतिक कलादालन हे आपली कला दाखविण्याचे तसेच नवोदित कवी, लेखक, पारंपरिक लोकनृत्य विविध वाद्यकला वाढविण्यासाठी हक्काचे व्यासपीठ होणार आहे.
 
 
याकरिता आ. पाडवी यांच्या प्रयत्नाने आदिवासी विकास मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली असून सांस्कृतिक भवनचा मार्ग मोकळा झाला आहे. ग्रामीण व शहरी आदिवासी सांस्कृतिक भवनाकरिता प्रत्येकी 1 कोटी असे 2 कोटींचा निधी उपलब्ध झाला असून या कामाचे भूमिपूजन आ. उदेसिंग पाडवींच्या हस्ते करण्यात आले.
 
 
यावेळी प्रांताधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विनय गौडा, मुख्यधिकारी जनार्दन पवार, नगराध्यक्ष अजय परदेशी, भाजपा तालुका अध्यक्ष श्यामसिंग राजपूत, योगेश चौधरी, नगरसेवक योगेश पाडवी, रामा ठाकरे, अमानुदिन शेख, हेमलाल मगरे, अनुप उदासी, उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@