फैजपूरला आचार्य जगन्नाथ महाराज पुण्यतिथी महोत्सव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Dec-2018
Total Views |

 
फैजपूर : 
 
महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज समाधीस्थळी उपस्थित असंख्य भाविकांना आशीर्वचन देताना सांगितले की, ब्रह्मलीन जगन्नाथ महाराज यांचा 17 वा पुण्यतिथी मोहोत्सव 13 व 14 डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.
 
 
या कार्यक्रमास महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान या ठिकाणावरून असंख्य भाविक भक्तांसह व्यासपीठावर प.पु छगनबाप्पा, प.पु. संत गोपालचैतन्य महाराज, महामंडलेश्वर पुरुषोत्तम दासजी महाराज, राष्ट्रीय कीर्तनकार योगेश्वर उपासनी महाराज, मानेकर बाबा शास्त्री, श्यामचैतन्यदासजी महाराज, हभप अंकुश महाराज, हभप नितीन महाराज, ब्रह्मकुमारी शकुंतला दीदी यासह अनेक संत उपस्थित होते.
 
 
वृंदावनधाम पाल येथील गोपालचैतन्यजी महाराज यांनी आशीर्वचन दिले की, मनुष्य जीवनाचे राहस्य गुरूंच्या सानिध्यात राहून समजते. परमगुरू शरीररुपी नसून एक तत्त्व आहे. त्यांच्या कृपेने मनुष्य संसारिक तपातून मुक्त होतो.
 
 
म्हणून प्रत्येकाने गुरूंचा उपदेश सर्वोत्कृष्ट मानावा, असे सांगितले. संत पंथाचे कार्य महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांनी सातासमुद्रपार तर पोहचवलेच पण फैजपूरनगरीत सर्व धर्माचे संस्थांना एकाच व्यासपीठावर आणण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे.
 
 
राष्ट्रीय कीर्तनकार योगेश्वर उपासनी महाराज म्हणाले की, यांनी पुण्यतिथी अशाच संताची साजरी केली जाते की, जे ब्रह्मलीन होऊन आपले कार्य समाजासाठी भविष्यात प्रेरणादायक ठरते. यावेळी महामंडलेश्वर पुरुषोत्तमदास महाराज, मानेकर बाबा शास्त्री, प.पु. छगनबाप्पा महाराज यांनी आशीर्वचन दिले.
 
 
दरम्यान, सतपंथ संस्थानचा अधिकृत पेन आणि 11 कोटी मंत्र जप लिहिलेल्या वह्यांचे पूजन संतांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आ. हरिभाऊ जावळे, माजी आ. शिरीष चौधरी, माजी जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, संजय गांधी अध्यक्ष विलास चौधरी, मसाका संचालक नरेंद्र नारखेडे यासह असंख्य भाविक उपास्थित होते. सूत्रसंचलन शैलेंद्र महाजन व निर्मल चतूर यांनी केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@