काशिनाथ पलोड शाळेत निवासी शिबीर उत्साहात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Dec-2018
Total Views |
जळगाव : 
 
विवेकानंद प्रतिष्ठान संचालित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलच्या सिनि. केजीच्या विद्यार्थ्यांचे निवासी शिबीर शानभाग विभागात नुकतेच झाले.
 
 
मुलांनी स्वावलंबी बनावे व सामाजिकतेचे भान यावे म्हणून शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी घोडेस्वारी, विविध मैदानी खेळ, नृत्य, गाणे यांचा आनंद लुटला तसेच वृद्धाश्रमात आजी-आजोबांची भेट घेतली.
 
 
शाळेतील कर्मचारी संजय आंबोदकर यांनी जोकरच्या वेशभूषेत केलेले मनोरंजन विशेष आकर्षण ठरले. रात्री मुलांनी शेकोटीचाही आनंद घेतला. शिबीर समन्वयिका अनघा सागडे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.
शैक्षणिक समुपदेशन सेमीनार
 
 
पलोड शाळेत इन्स्टि.ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाद्वारा चार्टर्ड अकाउंटंट बनण्याविषयी विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात आले. चार्टर्ड अकाउंटंट बनण्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये अनेक गैरसमज व भीती असते.
 
 
ती घालविण्याच्या दृष्टिने व सी.ए.बनण्याकरिता आवश्यक तंत्र व मंत्र देण्याकरिता चार्टर्ड अकाउंटंट संस्थेने प्रशिक्षक दर्शन जैन आणि संस्थेचे अध्यक्ष सागर पटनी यांनी विद्यार्थ्यांना अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. प्राचार्य अमितसिंह भाटिया यांचे कार्यक्रमासाठी मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांचे तंत्रज्ञानातील यश
 
 
काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना सीएई फाउंडेशन महिंद्रा कंपनी लिमिटेडद्वारा आयोजित जेट टॉय मेकिंग स्पर्धेमध्ये घवघवीत यश मिळाले.
 
7 रोजी विवेकानंद प्रतिष्ठानच्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सोहम इखनकर, गौरव पाटील, भूमी देशमुख आणि दिव्यांशी पात्रा या पलोडच्या विद्यार्थ्यांना अ‍ॅक्युरसी व रनर अपचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
 
 
या प्रयत्नात त्यांना पलोडच्या सर्व विज्ञान शिक्षकांचे मोलाचे मागदर्शन लाभले तसेच प्राचार्य अमितसिंह भाटीया यांनी सर्व विजयी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
 
गोवर, रुबेला लसीकरण
 
 
आरोग्य आणि कुटुंब कल्याण भारत सरकारच्या राष्ट्रव्यापी अभियानाद्वारे गोवर व रुबेलापासून बालकाचे रक्षण करणार्‍या एम.आर.लसीकरण 12 रोजी पलोड पब्लिक स्कूलमध्ये करण्यात आले.
 
 
याचा लाभ शाळेतील नर्सरीपासून 10 वीपर्यंतच्या 1,688 विद्यार्थ्यांनी घेतला. आरोग्य अधिकारी डॉ. संजय चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डॉ.निलेश, डॉ.विक्रम तसेच एस.ए.महाजन, ए.सी.ठाकरे व मुख्याध्यापक अमितसिंह भाटीया व सर्व वैद्यकीय सहाय्यक अधिकारी यांच्या मार्गदर्शन व देखरेखीखाली हे लसीकरण यशस्वीरीत्या पार पडले.
@@AUTHORINFO_V1@@