१५ डिसेंबर म्हणजे ‘जागतिक चहा दिवस’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Dec-2018
Total Views |


 

अनेकांचा दिवस हा चहा पिल्याशिवाय सार्थकी लागत नाही. कोणी डोकं दुखतंय म्हणून तर कोणी फ्रेश होयचंय म्हणून चहाचा झुरका घेतच असतात. असे म्हटले जाते, जगात पाण्यानंतर सर्वात जास्त प्यायला जातो तो चहाच. ठराविक वेळ झाली की काही लोकांना चहा मिळाला नाही तर अस्वस्थ वाटते. १५ डिसेंबर हा दिवस ‘जागतिक चहा दिवस’ म्हणून पाळला जातो. अशा ‘चहा’प्रेमींना आज जागतिक चहा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.... 

 

यानिमित्ताने जाणून घेऊया चहाचा भारतातील इतिहास

 

 
 

> १८१५ साली भारतात चहाचा शोध लागला.

 

 
 

> भारताचे गर्व्हनर जनरल लॉर्ड बॅटिक यांनी १८३४ साली भारतात चहाचे उत्पादन कसे करता येईल? याबाबत एक समिती स्थापन केली.

 

 
 

> १८३५साली आसाममध्ये चहाचे मळे सुरू झाले.

 

 
 

> जगामध्ये चहा उत्पादनात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. चीनचा यामध्ये पहिला क्रमांक आहे.

 

 
 

> सध्या आसाम हे भारतातील सगळ्यात मोठे उत्पादक राज्य आहे. अंदाजे ५२ % चहाचे उत्पादन हे आसाममध्ये केले जाते.

 

 
 

> त्यानंतर हिमाचल प्रदेश, कर्नाटक आणि उत्तर पूर्व राज्यांमध्ये चहाचे उत्पादन केले जाते.

 

 
 

> सध्या भारतामध्ये सामान्य चहासोबतच ग्रीन टी, मसाला चहा, दार्जिलिंग चहा, आसाम चहा, निलगिरी चहा तसेच गवती चहा हे सर्वाधिक पिले जातात.

 

 
 

> काळानुसार चहाच्या फ्लेवर्समध्येही नवनवीन प्रकार येत आहेत.

 

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@