बहुभाषिक ब्राह्मण महिला संघातर्फे योग बस्ती शिबीर, व्याख्यान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Dec-2018
Total Views |
जळगाव : 
 
बहुभाषिक ब्राह्मण महिला संघाची वार्षिक सभा रविवार, 16 रोजी सायंकाळी 4 वाजता नवसाचा गणपती मंदिर हॉल, बजरंग बोगद्याजवळ होत आहे. तसेच या ठिकाणी योग बस्ती शिबीर व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
 
 
आयुर्वेदिय पंचकर्मातील बस्ती चिकित्सा चाळिशीनंतर होणार्‍या आजारासाठी अत्यंत प्रभावी चिकित्सा आहे. हार्मोन्समुळे शरीरात होणारे बदल आणि त्यावर होणारा बस्ती चिकित्सेचा परिणाम हे समजून घेण्यासाठी हे विशेष व्याख्यान महिलांसाठी होणार आहे.
 
 
व्याख्यानात आनंददायी चाळिशी : 
 
वैद्या. विशाखा गर्गे, तसेच चाळिशीतील पंचकर्म ः वैद्या. वृषाली छापेकर हे माहिती देणार आहेत. तसेच बस्ती शिबिरासाठी नावनोंदणी होणार आहे. तसेच 17 ते 31 डिसेंबरदरम्यान कोणतेही 7 दिवस बस्ती शिबीर होईल.
 
शिबिरासाठी यश आयुर्वेद उपचार केंद्र, डॉ. शिरीष गर्गे, डॉ. विशाखा गर्गे, समायू आयुर्वेद चिकित्सालय, डॉ. श्रीरंग छापेकर, वृषाली छापेकर तर ज्योती आयुर्वेदचे डॉ. भूषण देव, डॉ. रेणू देव हे स्त्री व पुरुषांसाठी राहणार आहेत.
 
मोठ्या संख्येने शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थापक अध्यक्षा सुधा खटोड व मंडळाच्या अध्यक्षा स्वाती कुलकर्णी यांनी केले आहे.
 
 
अधिक माहितीसाठी सुधा खटोड, आमला पाठक, शिल्पा नाईक (7774068815), मंजूषा राव, छाया त्रिपाठी यांच्याशी संपर्क साधावा.
@@AUTHORINFO_V1@@