अखेर बंटी ठाकूरची शरणागती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Dec-2018
Total Views |

वाघळी माध्यमिक विद्यालयातील अश्लिल चित्रफित प्रकरण

वाघळी ता. चाळीसगाव :
 
 
येथील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनीस अश्लील चित्रफीत दाखविणारा शिक्षक तथा राष्ट्रवादीचा नगरसेवक बंटी उर्फ सूर्यकांत ठाकूर अखेर बुधवारी रात्री पोलिसांना शरण आला.
 
 
गुरुवारी पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता, त्याला 15 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
 

 
 
 
 
 
गेल्या 50 दिवसांपासून तो फरार होता. अटकपूर्व जामिनासाठी त्याचा सर्वोच्च न्यायालयातील अर्जही 11 डिसेंबर रोजी फेटाळला गेला होता. त्याआधी जिल्हा सत्र न्यायालयानेही अर्ज फेटाळला होता.
 
 
त्यामुळे त्याला पोलिसांना शरण येण्याशिवाय अन्य पर्याय नव्हता. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्तींनी त्याचा अर्ज फेटाळतांना अटकपूर्वच काय? संशयित आरोपीला रेग्यूलरचा जामीनही देण्यात येऊ नये, अशी टिपणी नोंदविली होती. सर्व पर्याय संपल्याने तो पोलिसांना शरण गेला.
शिक्षणाधिकार्‍यांकडून निलंबनाची परवानगी
 
 
संशयित आरोपी शिक्षक बंटी ठाकूर याच्या निलंबनाचा प्रस्ताव राष्ट्रीय प्रसारक मंडळाच्या संचालकांनी परवानगीसाठी शिक्षणाधिकार्‍यांकडे पाठवला होता.
 
 
त्याला जि.प.च्या शिक्षणाधिकार्‍यांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे त्याचे निलंबन निश्चित झाले आहे. ही कारवाई कधी होते याकडे सर्वांचे लक्ष आहे.
@@AUTHORINFO_V1@@