सी.एम.चषक स्पर्धांना चाळीसगावला सुरुवात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Dec-2018
Total Views |

चाळीसगाव : 
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून भारतातील सर्वात मोठा क्रीडा व कला महोत्सव म्हणून ओळखल्या जाणार्‍या सी.एम.चषक स्पर्धांना चाळीसगाव तालुक्यात आ. उन्मेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात झाली असून जवळपास 10 हजाराहून अधिक स्पर्धकांनी रांगोळी तसेच 6 हजार स्पर्धकांनी चित्रकला स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला.
 
 
सर्व सहभागी स्पर्धकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहीचे प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच पात्र स्पर्धकांच्या रांगोळी व चित्रकला कलाकृती यातून तालुकास्तरावर प्रथम, द्वितीय, तृतीय विजेते निवडले जाणार आहेत.
 
 
सीएम चषक स्पर्धेचा पुढील टप्प्याचे वेळापत्रक देखील जाहीर झाले असून त्यात प्रामुख्याने कुस्ती, कॅरम, गायन, व्हॉलीबॉल, सोलो व ग्रुप डान्स, 100/400 मी.धावणे स्पर्धा, हँडबॉल, कबड्डी, खो खो स्पर्धा आदी स्पर्धा घेण्यात येणार आहेत. स्पर्धांमध्ये चाळीसगाव तालुक्यातील 25 हजार स्पर्धकांनी ऑनलाईन नोंदणीच्या माध्यमातून सहभाग नोंदवला आहे.
 
 
त्यामुळे खर्‍या अर्थाने हा चाळीसगाव तालुक्याच्या इतिहासातील आजवरचा सर्वात मोठा क्रीडा महोत्सव असल्याचे आ. उन्मेश पाटील यांनी सागितले. शुक्रवारी 14 रोजी स्वच्छ भारत कुस्ती स्पर्धा, नानासाहेब य ना चव्हाण महाविद्यालय, हिरापूर रोड, चाळीसगाव येथे होणार आहेत.
 
 
कौशल्य भारत कॅरम स्पर्धा -शनिवार 15 डिसेंबरला -सकाळी 9. वाजेपासून बी पी आर्ट्स, एस एम ए सायन्स, के के सी कॉमर्स कॉलेज ट्रॅक ग्राउंड, इनडोअर हॉल, धुळे रोड याठिकाणी होईल.
 
उजाला गायन स्पर्धा याच दिवशी -सायंकाळी 5 वा. होईल.जलयुक्त शिवार व्हॉलीबॉल स्पर्धा-सायंकाळी 6 वाजेपासून अंध शाळा मैदान याठिकाणी होणार आहे.
 
 
तसेच उज्ज्वला स्पर्धा (सोलो व ग्रुप डान्स) 16 रोजी - नानासाहेब य ना चव्हाण महाविद्यालय, हिरापूर रोड याठिकाणी तर उडान/मुद्रा 100/400 मी.धावणे स्पर्धा 17 रोजी बी पी आर्टस, एस एम ए सायन्स, के के सी कॉमर्स काँलेज ट्रँक ग्राऊंड, करगाव रोड येथे होणार आहे. 27 डिसेंबरपर्यंत या विविध स्पर्धा होणार आहेत.
 
@@AUTHORINFO_V1@@