अंबानींनी मानले सर्वोच्च न्यायालयाचे आभार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Dec-2018
Total Views |
 

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी राफेल करार प्रकरणी कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचे स्पष्ट करत उद्योगपती अनिल अंबानी यांना क्लिन चिट दिली आहे. अनिल अंबानी यांनी या निकालाचे स्वागत करताना मी निर्दोषच होतो, असे म्हटले आहे.

 

राफेल कराराअंतर्गत रिलायन्सची भारतातील भागिदार कंपनी म्हणून निवड करण्यात आली होती. मात्र, हिंदुस्तान एरॉनॉटिक्स ही सरकारी कंपनी अस्तित्वात असताना रिलायन्सची निवड का, असा सवाल विरोधकांनी विचारला होता. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. शुक्रवारी याप्रकरणी कोणताही गैरव्यवहार झालेला नाही, सा निवाडा सर्वोच्च न्यायालयाने दिला.

 

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर अनिल अंबानी यांनी समाधान व्यक्त करत माझ्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे आहेत, असे म्हटले. राजकीय स्वार्थ साधण्याच्या हेतुनेच माझ्यावर हे आरोप लावण्यात आले होते, असा आरोप त्यांनी विरोधकांवर केला. दरम्यान राफेल कराराबाबतच्या या निर्णयानंतर अंबानी यांच्या रिलायन्स एडीएजी शेअरने मोठ्या कालावधीनंतर उसळी घेतली. निकालानंतर शेअरने १५ टक्क्यांनी उसळी घेतली. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये १.७४ टक्के, रिलायन्स कॅपिटलमध्ये २.२७ टक्के तेजी दिसून आली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@