सेवाशुल्कात होणारी वाढ मागे घेण्यासाठी शिवसेनेतर्फे ठिय्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Dec-2018
Total Views |

 
 
जळगाव : 
 
घनकचरा व्यवस्थापन जळगावकरांकडून घरगुती प्रयोजनार्थ 2 टक्के आणि वाणिज्य वापरासाठी 4 टक्के सेवाशुल्क करवाढ मागे घेण्यासाठी शिवसेनेतर्फे गुरुवारी मनपात ठिय्या आंदोलन करण्यात आले. तसेच महापौर यांच्या दालनात खुर्चीवर हार चढवून करवाढीचा निषेध करण्यात आला.
 
 
यावेळी शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, मनपातील विरोधी गटनेते सुनील महाजन, माजी महापौर विष्णू भंगाळे, नगरसेवक प्रशांत नाईक, अनंत (बंटी) जोशी, नगसेविका राखी सोनवणे यांच्यासह शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.
 
 
मनपाच्या महासभेत 7 रोजी करवाढ बहुमताने मंजूर करण्यात आलेली आहे. या विषयास शिवसेनेला विश्वासात न घेता बहुमताच्या जोरावर सत्ताधार्‍यांनी हा प्रस्ताव मंजूर केला आहे. याच्या निषेधात शिवसेनातर्फे आंदोलन करण्यात आले आहे.
 
 
निवेदनात म्हटले आहे की, सद्यःस्थितीत शहरातील साफसफाईची स्थिती अतिशय दयनीय आहे. साफसफाई नियमित व चांगल्याप्रकारे होत नसून गटारी व नाले साफसफाई होत नाही.
 
 
शहरात ठिकठिकाणी कचर्‍याचा ढीग साचलेले आहे. विशेष साफसफाई कर 4 टक्के व हॉटेल व वाणिज्य प्रतिष्ठानसाठी विशेष साफसफाई कर 2 टक्के अतिरिक्त कर शहरवासीयांसाठी अन्यायकारक असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
 
 
दरम्यान, करवाढ मनपा प्रशासनाने तत्काळ मागे घ्यावा अन्यथा शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनात दिला आहे.
 
 
निवेदनावर माजी महापौर नितीन लढ्ढा, सुनील महाजन, प्रशांत नाईक, भागचंद जैन, इब्राहिम मुसा पटेल, जयश्री महाजन, शबाना खाटीक, राखी सोनवणे, ज्योती तायडे, मनोज चौधरी, लता सोनवणे, नितीन बरडे, गणेश सोनवणे आदींच्या स्वाक्षर्‍या आहे.
खुर्चीस निवेदन देणे अयोग्य :  बालाणी
 
 
शिवसेनेतर्फे घनकचरा व्यवस्थापनाच्या अंमलबजावणीसाठी शुल्क वाढीविरोधात निवेदन देण्यात येणार होते. मात्र, निवेदनप्रसंगी महापौर सीमा भोळे हे निवेदन स्वीकारण्यास कार्यालयात येत असताना ते येण्यापूर्वी शिवसेना नगरसेवकांनी घाई गडबडीत त्यांच्या खुर्चीस निवेदन दिलेले आहे.
 
 
महापौर निवेदन स्वीकारण्यासाठी कार्यालयात येत असताना त्यापूर्वीच खुर्चीस निवेदन देणे योग्य कृती नाही तसेच कार्यालयीन शिष्टाचारान्वये आंदोलन न करताही आम्ही या निवेदनाचा समक्ष स्वीकार केला आहे.
- भगतराम बालाणी गटनेता, भाजपा
@@AUTHORINFO_V1@@