बोदवडमध्ये शासकीय धान्य खरेदी सुरु

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Dec-2018
Total Views |

 
 
 
बोदवड :
 
राज्य शासनाच्या माध्यमातून येथील तालुका सहकारी संघातर्फे जामनेर रोडवरील तहसीलच्या गोडावूनमध्ये नुकतीच धान्य खरेदी केंद्राची सुरुवात झाली. तहसीलदार रवींद्र जोगी यांच्या हस्ते काटा पूजन करण्यात आले.
 
 
या केंद्रात मका विक्रीसाठी 418 व ज्वारीसाठी 30 शेतकर्‍यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. हायब्रीड ज्वारीचा भाव 2,430 व मक्याचा भाव 1,700 रुपये निश्चित करण्यात आला आहे.
 
 
केंद्राच्या शुभारंभावेळी चार शेतकर्‍यांच्या ज्वारीची खरेदी केली गेली. शिरसाळा येथील शांताराम बोरसे (13 क्विंटल), घाणखेडचे सुरेश वराडे (15 क्विंटल), नांदगावच्या संगीता सोनवणे (5 क्विंटल), नांदगावचे विकास सोनवणे यांची 5 क्विंटल ज्वारी असे एकूण 38 क्विंटल धान्य खरेदी करण्यात आले.
 
 
ज्या शेतकरी बांधवांना मका विक्री करायची असेल त्यांनी संकेत स्थळावर नोंदणी करावी. खरेदीवेळी पिकाची नोंद असलेला ऑनलाइन सातबारा उतारा आवश्यक आहे. 31 डिसेंबरपर्यंत खरेदीचा कालावधी असल्याच्या सूचना तहसीलदार यांनी केल्या.
 
 
 
यावेळी तहसीलदार रवींद्र जोगी ,बोदवड बाजार समिती सचिव राजू कालबैले ,व्यवस्थापक तुकाराम राणे, ग्रेडर संतोष इंगळे, कारकून राजेश तायडे ,महसूल विभाग प्रशांत पाटील, संजय पाटील व शेतकरी उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@