संत सावता माळी महिला युवक संघाच्या तालुकाध्यक्षपदी सुरेखाताई माळी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Dec-2018
Total Views |

उपाध्यक्षपदी सरलाताई माळी यांची निवड

चोपडा : 
 
येथील सावता माळी युवक संघाच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी नगरसेविका सुरेखाताई मोतीराम माळी, उपाध्यक्षपदी सरलाताई प्रभाकर माळी यांनी निवड करण्यात आली आहे.
 
 
या निवडीबद्दल त्यांचे संत सावता माळी समाजाचे अध्यक्ष नारायण बापू माळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
 
 
यावेळी खान्देश विभागीय अध्यक्ष जितेंद्र महाजन, जळगाव जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण माळी, जिल्हा संपर्क प्रमुख महेंद्र महाजन, जळगाव जिल्हा सल्लागार योगेश भिमराव महाजन, तालुका संपर्क प्रमुख रोहित माळी, चोपडा तालुका उपाध्यक्ष अल्केश माळी, सोशल मीडिया प्रमुख समाधान माळी, तालुका शहर सचिव सागर महाजन ,शहर सोशल मीडिया प्रमुख उमेश माळी, चोपडा शहर सचिव विठ्ठल माळी, संघटक नरेंद्र महाजन यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@