विज्ञान प्रदर्शनामुळे संशोधनाची गोडी वाढते

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Dec-2018
Total Views |


आ. एकनाथराव खडसेंचे मत

 
 
मुक्ताईनगर : 
 
विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमधील कल्पकतेला चालना मिळून संशोधनाची गोडी वाढते. नवनवीन संकल्पना मांडल्या जाऊन त्यावर काम करता येते.
 
तालुका, जिल्हा पातळीवरील विज्ञान प्रदर्शनातूनच देशासाठी उद्याचे शास्त्रज्ञ तयार होतील, असे मत माजी मंत्री तथा आ. एकनाथराव खडसे यांनी सांगितले.
 
 
मुक्ताईनगर पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे बुधवारी आयोजित विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. चांगदेव येथील एस. बी. चौधरी हायस्कूलमध्ये हे प्रदर्शन झाले.
 
 
या तालुकास्तरीय प्रदर्शनात विविध प्रकारची एकूण 85 उपकरणे ठेवली होती. त्यात प्राथमिक गट सहावी ते आठवी 40, माध्यमिक गटात 9 वी ते 12 वी 22, प्राथमिक शिक्षकांचे शैक्षणिक साहित्य - 10, माध्यमिक लोकसंख्या शिक्षण - 1, परिचर - 2, लोकसंख्या शिक्षण - 10 अशा उपकरणांचा समावेश होता.
 
 
प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी जिल्हा परिषद सदस्य नीलेश पाटील, जयपाल बोदडे, वैशाली तायडे, पंचायत समिती सदस्य विकास पाटील, विद्या पाटील, मुक्ताईनगरच्या नगराध्यक्षा नजमा तडवी, गटविकास अधिकारी डी. आर.लोखंडे, हायस्कूलचे चेअरमन अ‍ॅड. राजेंद्र चौधरी, गटशिक्षण अधिकारी व्ही. डी. सरोदे, मुख्याध्यापक एस. डी. पाटील, तालुका विज्ञान समन्वयक सी. डी. पाटील, अतुल पाटील आदी उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@