महाबळ परिसरातील उपअग्निशमन केंद्राचे लोकार्पण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Dec-2018
Total Views |

भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन यांच्या सहकार्यातून उभारणी

 
 
जळगाव : 
 
 
जैन इरिगेशन आणि भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन यांच्या सहकार्यातून भाऊंच्या उद्यान परिसरात असलेल्या जळगाव महापालिकाअंतर्गत महाबळ परिसरातील उपअग्निशमन केंद्राचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या उपअग्निशमन केंद्राचे लोकार्पण मंगळवारी मान्यवरांच्या हस्ते झाले.
 
 
भाऊंच्या उद्यानाजवळ असलेल्या उपअग्निशमन केंद्रात अग्निशमन कर्मचार्‍यांना अद्ययावत, आरामदायी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच याठिकाणी रुग्णवाहिका स्थानकाचीही निर्मिती केली आहे.
 
 
शिवाय महानगर पालिकाअंतर्गत पाणीपुरवठा, सार्वजनिक, विद्युत विभागातील कनिष्ठ अभियंत्यांचे युनिट ऑफिसचीही निर्मिती करण्यात आली आहे.
 
 
या तिघंही कार्यालयांमध्ये अद्ययावत फर्निचर कंपनीने केले आहे. उद्घाटन सोहळ्यास जळगावच्या महापौर सीमा भोळे, आ. सुरेश भोळे, उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे, जैन इरिगेशनचे विपणनप्रमुख अभय जैन, मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे उपस्थित होते.
 
 
याप्रसंगी महिला बालकल्याण समिती सभापती मंगला चौधरी, ज्योती चव्हाण, माजी नगरसेवक नितीन बरडे, राजू मराठे, मंगेश जोरे, पाणीपुरवठा अभियंता खडके, जैन इरिगेशनचे सहकारी आशिष भिरूड, विशाल सूर्यवंशी, शाखा अभियंता राम पवार आदींनी यशस्वितेसाठी सहकार्य केले.
रेस्ट रूमचीही निर्मिती
 
 
भाऊंच्या उद्यान परिसरात असलेल्या उपअग्निशमन केंद्रात तीन वाहने लावण्याची व्यवस्था आहे. दोन अग्निशमन बंब व एक रुग्णवाहिका या ठिकाणी उभी राहील, अशी व्यवस्था आहे.
 
 
तसेच अग्निशमन विभागातील कर्मचार्‍यांना आराम करता यावा, यासाठी भाऊंच्या उद्यानाजवळील उपअग्निशमन केंद्रात रेस्ट रूमचीही व्यवस्था करण्यात आली आहे. यात चार बेड असून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
गांधी उद्यान परिसरातही अद्ययावत युनिट ऑफिस
 
 
जैन इरिगेशनच्या माध्यमातून महात्मा गांधी उद्यानाचे नूतनीकरण करण्यात आले. याच परिसरात मनपाअंतर्गत युनिट ऑफिसची निर्मिती जैन इरिगेशनतर्फे करण्यात आली आहे.
 
 
यात दोन ऑफीस तसेच भोजन व्यवस्थेसाठी एक रूम, अद्ययावत फर्निचरची व्यवस्था आहे. या दोघंही युनिट ऑफिसचे आ. सुरेश भोळे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
@@AUTHORINFO_V1@@