रावेर बाजार समिती सभापतीपदी राजीव पाटील, उपसभापतीपदी कैलास सरोदे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Dec-2018
Total Views |


 
 
 
रावेर : 
 
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी राजीव पाटील तर उपसभापतीपदी जि.प.सदस्य कैलास सरोदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
 
 
ठरल्याप्रमाणे सभापती नीळकंठ चौधरी, उपसभापती अरुण पाटील यांनी राजीनामा दिल्यान हे पदे रिक्त होते. गुरुवारी सभापतीपदासाठी राजीव पाटील तर उपसभापतीपदासाठी कैलास सरोदे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवडीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी एस.एफ. गायकवाड यांनी केली.
 
 
सचिव गोपाळ महाजन, उपसचिव एस. के. तायडे यांनी सहकार्य केले. विशेष सभेला संचालक नीळकंठ चौधरी, डी.सी.पाटील अरुण पाटील. डॉ. राजेंद्र पाटील, गोपाळ नेमाडे, गोंडू महाजन, विनोद पाटील, प्रमिला पाटील, कल्पना पाटील, प्रमोद धनके, श्रीकांत महाजन उस्मान तडवी, पंकज येवले, योगेश पाटील, संगीता वाणी आदी उपस्थित होते.नवनिर्वाचित सभापती, उपसभापतींचा सत्कार करण्यात आला.
 
 
यावेळी राष्ट्रवादी किसान सभा जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, सरचिटणीस महेश चौधरी, माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, प्रल्हाद पाटील, माजी नगराध्यक्ष हरीश गणवाणी, पंकज पाटील, खरेदी-विक्री संघ चेअरमन पी.आर पाटील, अ‍ॅड. योगेश गजरे, डॉ. सुभाष पाटील, वसंत महाजन, मोहन पाटील, रामदास पाटील, लीलाधर पाचपांडे, काशिनाथ पाटील, शशिकांत पाटील, पांडुरंग पाटील, संगीता वाणी, अनिलशेठ अग्रवाल आदींनी नवनिर्वाचित सभापती, उपसभापती यांचा सत्कार केला.
@@AUTHORINFO_V1@@