पाण्याच्या बचतीसाठी लोकचळवळीची गरज - डॉ.पोळ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Dec-2018
Total Views |

जळगाव : 
 
सार्वजनिक जीवनात पाण्याला अतिशय महत्व असून पावसाच्या पाण्याचा थेंबन थेंबच्या बचतीसाठी लोकचळवळीची आवश्यता असल्याचे प्रतिपादन पाणी फाउंडेशनचे मुख्य मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ यांनी आयोजित कार्यशाळेत बोलताना केले.
 
 
जिल्हा प्रशासनामार्फत पाणी फाऊंडेशच्या पहिल्या जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. पोळ बोलत होते. यावेळी चाळीसगावचे आमदार उन्मशे पाटील, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एस.म्हस्कर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, पाणी फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक विकास गायकवाड, चाळीसगांव, अमळनेर, पारोळा आणि जामनेर या तालुक्यांचे पदाधिकारी, अधिकारी, सरपंच व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
 
डॉ. पोळ पुढे म्हणाले की, मानवी जीवनात पाण्याचे महत्व पटवून पाणलोट, जलसंधारण ,पाणी आडवा पाणी जिरवा आणि जलयुक्त शिवार अशा लोकउपयोगी योजना यशस्वी होण्यासाठी केवळ शासन, प्रशासनावर विसबून न राहता प्रत्येक नागरीकाने आपणही समाजाचे देणे लागतो या उद्देशाने काम केल्यास पाणी फाऊंडेशन या संस्थेला लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त होवून जिल्ह्यातील सर्व गावे पाणीदार व्हायला वेळ लागणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगीतले.
 
 
समाजसेवा करतांना अडचणी अनेक येतात पण त्यांचा फारसा विचार न करता सकारात्मकतेने आपले काम करत राहील्यास नकार देणार्‍याकडून होकार मिळायला उशीर लागत नाही. असेही त्यांनी अनेक रंजक उदाहरणासह सांगितले.
 
 
जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी पाणी फाऊंडेशनचे काम करणार्‍या सर्व कार्यकर्त्याचे स्वागत करुन पुढील कामाला शुभेच्छा दिल्या. पाणी फाऊंडेशनचे प्रशिक्षण जळगांव मुख्यालयी आयोजित केल्यास प्रशासनाकडून सहकार्य केले जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
 
 
सूत्रसंचलन कृषी विभागाचे उपसंचालक अनिल भोकरे यांनी तर आभार पाणी फाऊंडेशनचे जिल्हा समन्वये विकास गायकवाड यांनी मानले.
@@AUTHORINFO_V1@@