महाराजांच्या पत्नी म्हणून 'जिजाऊं'चा उल्लेख !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Dec-2018
Total Views |
 
 

मुंबई : ११ वीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यात येणाऱ्या संस्कृत सारिका या पुस्तकाच्या मार्गदर्शिकेमुळे (गाईड) वाद उभाळून आला आहे. यात छत्रपती शिवाजी महाराज यांची वंशावळ चुकीची दाखवण्यात आली आहे. त्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री वीरमाता जिजाबाई यांचा उल्लेख त्यांच्या पत्नी म्हणून करण्यात आला आहे. दरम्यान, ही मार्गदर्शिका वादग्रस्त असून महाराजांची बदनामी करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आला आहे.

 

लातूरच्या 'निकिता पब्लिकेशन्स'ने ही मार्गदर्शिका छापली आहे. तर राजेंद्र शास्त्री यांनी ती लिहिली आहे. दरम्यान जिजाऊंना म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आईंना पत्नी म्हणून दाखवून जाणीवपूर्वक करण्यात आलेली बदनामी असल्याचे संभाजी ब्रिगेडकडून सांगण्यात आले. दरम्यान, ही मार्गदर्शिका रद्द करावी आणि संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांच्याकडून करण्यात आली आहे.

''महाराष्ट्र प्रांतातील स्वयं घोषित इतिहास अभ्यासक व कुठलेही प्राथमिक संदर्भ पुरावे न देता इतिहास लेखन करणाऱ्या इतिहास संशोधकांची संख्या वाढत चालली आहे. आपण इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या घटना, व्यक्ती याबाबत लिहिताना इतिहास भान राखणे अत्यंत गरजेचे असूनही सध्या ते फारच कमी पाळले जात आहे,'' अशी प्रतिक्रिया इतिहास अभ्यासक डॉ. श्रीदत्त राऊत यांनी दै. 'मुंबई तरूण भारत'शी बोलताना दिली.

 

उपलब्ध झालेल्या पानावरील चूक छपाई चूक आहे की प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेली आहे हे मुळात शोधणे गरजेचे आहे. तत्सम लेखकाने याबाबत माफीनामा किंवा खुलासा लेखी प्रसिद्ध करणे गरजेचे आहे.

 
- डॉ. श्रीदत्त राऊत, इतिहास अभ्यासक
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@