जैन इरिगेशनला कर्नाटकातील 584 कोटींचे कंत्राट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Dec-2018
Total Views |

अवर्षणप्रवण तीन जिल्ह्यातील 31,547 एकर क्षेत्र येणार ओलिताखाली

 
 
जळगाव : 
 
 
जैन इरिगेशनच्या ‘रिसोर्स टु रुट’ या संकल्पनेवर आधारित विविध प्रकल्प जगभरात कंपनीने पूर्ण केले आहेत. ठिबक सिंचनाच्या क्षेत्रात जगभर लौकिक असलेल्या जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.ला सिंगातालूर उपसा योजनेअंतर्गत 584 कोटींचा कंत्राट मिळाले आहे. यामुळे अवर्षणप्रवण तीन जिल्ह्यातील 31 हजार 547 एकर क्षेत्र ओलिताखाली येणार असून 10 हजार शेतकर्‍यांना त्याचा लाभ होणार आहे.
 
 
जैन इरिगेशनच्या ‘रिसोर्स टू रूट’ या संकल्पनेवर आधारित आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (पीएमकेएसवाय) ‘हर खेत को पानी’ आणि ‘पाणी थेंबाने पीक जोमाने’ या तत्त्वावर सिंगातालूर उपसा योजना अंतर्गत कर्नाटक निरावरी निगम लि. व कर्नाटकच्या जलसंसाधन विभागाकडून हे कंत्राट कंपनीला मिळाले आहे.
 
 
या योजनेत परिसरातील बेल्लारी, गडाग आणि कोप्पल जिल्ह्यातील काही तालुक्यांचा समावेश आहे. यातील हुविनाहाडागली, गडाग, मुंदरगी, कोप्पल, येलबुर्गा तालुक्यातील अवर्षणप्रवणग्रस्त क्षेत्रातील जमिनीला ओलिताखाली आणता येईल.
 
 
सूक्ष्मसिंचन प्रणालीमुळे 31 हजार 547 एकर (12 हजार 767 हेक्टर) जमीन ओलिताखाली येणार आहे. याचा मुंदरगी शाखा कालवा अंतर्गत 31 खेड्यातील 10 हजार शेतकर्‍यांना लाभ होईल. जैन इरिगेशनला टर्नकी तत्त्वावर प्रकल्प मिळाला असून उभारणी ते देखभाल याची पाच वर्षे जबाबदारी कंपनीकडे राहील.
 
 
सिंगातालूर उपसा सिंचन योजने अंतर्गत मुंदरगी शाखा कालव्यातून पाणी उचलले जाईल आणि सूक्ष्मसिंचन प्रणालीने ते शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत पोहचविले जाईल.
 
 
त्यामुळे ‘स्त्रोतापासून ते मुळापर्यंत’ ही कंपनीची संकल्पना प्रत्यक्षात राबविली जाईल. यातून पाण्याची मोठी बचत होवून कार्यक्षमपणे वापर करता होणार आहे. सिंचनासाठी पंप हाऊस व पाण्याच्या टाक्या उभारण्यात येणार आहे.
 
 
या एकात्मिक प्रकल्पासाठी दाबयुक्त पाईपचे जाळे उभारले जाईल. यात एमएस, एचडीपीई, पीव्हीसी पाईपचा वापर केला जाणार आहे. या प्रकल्पामुळे कमांड क्षेत्रातील पाईपचे जाळे आणि सूक्ष्मसिंचन प्रणाली उभारूण पाणी वापराची कार्यक्षमता वाढेल.
 
जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. देशातील विविध राज्यात महत्त्वाकांक्षी योजना पूर्ण क्षमतेने राबवत आहे. कमी पाण्यात जास्त क्षेत्र ओलिताखाली आणण्याचे तंत्रज्ञान कंपनीने विकसित केले असल्याने त्याचा फायदा थेट शेतकर्‍यांना होणार आहे. शेतकर्‍यांच्याबद्दल कंपनीची असलेली बांधिलकी पाहुन कर्नाटकातील हे मोठे कंत्राट मिळाले आहे.
- अनिल जैन,
उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी,
जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. जळगाव
@@AUTHORINFO_V1@@