मुंबई, ठाण्यात शुक्रवारची रात्र जळीतकांडाने गाजली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Dec-2018
Total Views |



मुंबई : शुक्रवारी रात्री ठाण्यामध्ये २ तरुणांनी रॉकेल टाकून कार्यालय जाळण्याचा प्रयत्न केला. तर सायं परिसरात शुक्रवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास १७ गाड्यांना अज्ञातांनी आग लावल्याची घटना घडली आहे. शहरातील सायन परिसरातील श्री सुंदर कमलानगरमध्ये शुक्रवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास १७ गाड्यांना अज्ञातांनी आग लावल्याची घटना घडली आहे. या १७ मोटारसायकल रस्त्यावर पार्क केलेल्या होत्या. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या २ गाड्या घटनास्थळी पोहचल्या आणि त्यांनी ही आग आटोक्यात आणली. ही आग लागली की लावण्यात आली याबद्दलचा तपास सध्या सायन पोलीस ठाण्याचे अधिकारी करत असून परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून हा तपास सुरू आहे. परंतु, अचानकपणे १७ गाड्या जाळण्यात आल्याने परिसरात तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

 

ठाण्यामध्ये ९ दुचाकी जळीत कांड प्रकरण ताजे असताना शुक्रवारी मध्यरात्री २ तरुणांनी रॉकेल टाकून कार्यालय जाळण्याचा प्रयत्न केला. कार्यालयाच्या बाजूलाच पारवे मंडप आणि केटरिंगचे मोठे गाळे आहे. आग वेळीच विझल्याने मोठा अनर्थ टळला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. ठाण्यातील शिवाईनगर येथील इंद्रप्रस्थ बिल्डिंग शॉप नंबर ५ मध्ये युनिक पी. आर. एजन्सीचे कार्यालय आहे. मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास २ तरुण या कार्यालयाजवळ आले आणि त्यांनी ज्वलनशील पदार्थ दुकानावर टाकले. यामुळे आगीचा भडका उडाला. त्यानंतर ते २ तरुण घटनास्थळावरुन फरार झाले. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या कार्यालयालच्या जवळच पारवे मंडप आणि कॅटरींगचे मोठे गाळे आहेत. ज्यात कापडी आणि लाकडी सामान मोठ्या प्रमाणात आहे. या सामानाला आग लागली असती तर मोठा अनर्थ घडला असता.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@