मनातील मतभेद विसरून समाज संघटनासाठी संस्कारित करा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Dec-2018
Total Views |

लेवाशक्ती महिला मंचच्या अध्यक्षा रेखाताई भोळे

 
फैजपूर, ता. यावल :
 
श्रीराम मंदिर सभागृहात लेवाशक्ती महिला मंचच्या स्थापना कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून पुणे येथील लेवाशक्ती महिला मंच व गगनगिरी विश्व फाउंडेशनच्या अध्यक्षा रेखाताई भोळे बोलत होत्या. प्रमुख पाहुणे लेवा पाटीदार भोरगाव पंचायतचे कुटुंब नायक रमेश पाटील होते.
 
 
महिलांनी पारंपरिक संस्कृतीचा अभ्यास करून समाज सुदृढ करावा लग्न सोहळ्यातील कुप्रथा व फॅशनेबलला आळा घालण्यासाठी महिलांनी पुढाकार घेणे, ही काळाची गरज आहे. एकत्रित कुटुंब पद्धतीचा अमल करावा, असे प्रतिपादन कुटुंब नायक रमेशदादा यांनी केले.
 
 
रेखाताई भोळे अध्यक्षीय मनोगतात म्हणाले की, समाजातील सर्व माता-भगिनींनी आपल्यातील आपलं मन समाजासाठी समाज संस्कारित करण्याचे व सकारात्मकपणे समाज उत्थानासाठी खर्च करण्याचे मार्मिक आवाहन केले.
 
 
भोरगाव पंचायतचे कोषाध्यक्ष बी.के. चौधरी, भरत महाजन यांनी ही समयोचित मनोगत केले. यावेळी विभावरी इंगळे, गौरी सरोदे, मनोज ढाके, यतीन ढाके, माजी नगराध्यक्ष आशालता चौधरी, नगरसेविका शकुंतला भारंबे, वासंती चौधरी, सावदा नगराध्यक्ष अनिता येवले उपस्थित होते. संगीताताई चौधरी, शहराध्यक्ष जयश्री चौधरी, नमो मंच जिल्हाध्यक्ष मोहिनी पाटील उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@