धरणगावात गोवर, रुबेला लसीकरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Dec-2018
Total Views |

रॅलीद्वारे विद्यार्थ्यांची जनजागृती

 
 
धरणगांव : 
 
येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दू क्र.1 शाळेने गोवर आणि रूबेला लसीकरण मोहीम जनजागृतीसाठी गावात रॅली काढली. शाळेपासून जागृती अभियान सुरू करण्यात आले.
 
विद्यार्थ्यांनी हातात जनजागृती फलक घेऊन प्रबोधनपर घोषणाबाजी केली.शिक्षक विद्यार्थ्यांना सहज सोप्या भाषेत समजावून सांगत आहेत. 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील सर्व बालकांना गोवर, रुबेला लसीकरण शाळेत देण्यात येत आहेत.
 
 
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य सर्व शिक्षकवृंद कमरूद्दीन जनाब, शेख नबी, अब्दुल कलीम, अलाऊद्दीन, हबीबुलमुरसलीन, शेख नईम, आणि यांच्यासह बहुसंख्येने विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. जनजागृती पदयात्रा यशस्वितेसाठी शाळेचे मुख्याध्यापक शेख ऐनोद्दीन सय्यद हसन यांनी नियोजन केले.
@@AUTHORINFO_V1@@