अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Dec-2018
Total Views |
 
 

नवी दिल्ली : साहित्य क्षेत्रात सर्वोच्च मानला जाणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्काराची घोषणा झाली आहे. यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार सुप्रसिध्द लेखक अमिताव घोष यांना जाहीर करण्यात आला आहे. ज्ञानपीठ पुरस्कार निवड मंडळाने शुक्रवारी झालेल्या बैठकीत ही घोषणा केली.

 

५४व्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी अमिताव घोष यांनी निवड एकमताने करण्यात आली. अमिताव घोष यांचा जन्म कोलकत्ता येथे ११ जुलै १९५६ रोजी झाला असून शिक्षण डून स्कूलमध्ये झाले. प्रसिध्द लेथक विक्रम सेठ आणि रामचंद्र गुहा हे त्याचे समकालिन सहकारी होते. 'डून स्कूल'नंतर त्यांनी 'सेंट स्टिफन कॉलेज' आणि 'दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स' येथून पदवीचे शिक्षण घेतले.

 

अमिताव घोष न्युयॉर्क येथे वास्तव्याला आहेत. त्यांनी भारतात परतून इबिस त्रयीवर काम करण्यास सुरुवात केली, ज्यात 'सी ऑफ पॉपीज' (२००८), 'रिव्हर ऑफ स्मोक' (२०११) आणि 'फ्लड ऑफ फायर' (२०१५) यांचा समावेश आहे. २००७ मध्ये पद्मश्री जाहीर झाला. २००९ मध्ये त्यांना रॉयल सोसायटी ऑफ लिटरेचरचे फेलो म्हणून निवडण्यात आले.

 

२०१५ मध्ये घोष यांना फोर्ड फाऊंडेशन आर्ट ऑफ चेंज फेलो म्हणून सन्मान मिळाला. अमिताव घोष हे 'सर्किल ऑफ रीजन', 'द शेडो लाइन्स', 'द कलकत्ता क्रोमोसम', 'द ग्लास पॅलेस', 'द हंगरी टाइड' आणि 'सी ऑफ पॉपीज', या प्रसिध्द पुस्तकांचे लेखक आहेत. त्यांची इंग्रजी साहित्यातील नामवंत लेखकांमध्ये गणना होते. घोष यांच्या 'शॅडो लाइन्स' या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@