सत्ताधार्‍यांना बदनाम करण्याचे कारस्थान : आ. सुरेश भोळे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Dec-2018
Total Views |

 
 
जळगाव : 
 
अतिक्रमणाची कारवाई करताना प्रशासनाने दुकानदारांना नोटीस किंवा पूर्वसूचना न देऊन कारवाई केली. मनपाच्या महासभेत ठराव मंजूर होऊन कोर्ट चौकात दुकाने बांधण्यात आली होती.
 
 
त्या दुकानांवर कारवाई करीत प्रशासन सत्ताधार्‍यांना बदनाम करीत असल्याचा आरोप आ. सुरेश भोळे यांनी पत्रपरिषदेत केला.
 यावेळी भाजपाचे गटनेते भगतराम बालाणी, स्थायी समितीचे सभापती जितेंद्र मराठे व पदाधिकारी उपस्थित होते.
 
 
आ. भोळे पुढे म्हणाले की, शहरात कारवाई करताना प्रशासनाने भेदभाव केला आहे. आमचा अतिक्रमणास विरोध नसून ते अतिक्रमण नियमानुसार आणि व्यापार्‍यांशी चर्चा करून व्हायला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
 
आयुक्तांचा हा स्टंट आहे. बदलीसाठी ते प्रयत्न करीत आहे. कारवाईसाठी महासभेत ठराव मांडण्यात येऊन कारवाई झाली पाहिजे होती. ज्वेलरीच्या दुकानांचे शेडही पाडण्यात आल्याने सुरक्षेचा धोका उत्पन्न झाला आहे.
 
 
व्यापार्‍यांना तीन दिवसांची मुदत देण्यासाठी आयुक्तांशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधण्याचे प्रयत्न केला मात्र त्याला त्यांनी उत्तर दिले नाही.
 
 
अतिक्रमण राज्यात आहे. मनपाच्या 13 वा मजलाही अतिक्रमात येत असून त्यावर कशी कारवाई करणार, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. यासंदर्भात चर्चा करून टाईम झोन आखणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
 
 
भूसंपादनामध्ये झालेल्या गैरप्रकारामुळे ही तातडीने कारवाई करण्यात आली असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
@@AUTHORINFO_V1@@