शेंदुर्णीत गोवर, रुबेला लसीकरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Dec-2018
Total Views |

शेंदुर्णी : 
 
येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित खासगी प्राथमिक शाळेत केंद्रप्रमुख तथा शिक्षकमित्र सुभाष कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली गोवर, रुबेला लसीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
 
 
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनानंतर, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल निकम यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. याप्रसंगी डॉ. निकम यांनी मुलांच्या मनात असलेली भीती सोप्या भाषेत दूर केली.
 
 
शिक्षकांनी लसीकरणासंदर्भात कोणती काळजी घ्यावी, यावर सखोल मार्गदर्शन केले. कुमावत यांनी गोवर, रुबेला लसीकरणाचे महत्त्व यावर सखोल मार्गदर्शन केले.
 
 
प्रास्ताविक व सूत्रसंचालन मुख्याध्यापक मोहन पाटील यांनी केले. आभार श्रीमती हेमलता पाटील यांनी मानले. मुख्याध्यापक बापू बारी, पडवड नाना, रहाडे, सविता चौधरी, आशाताई आव्हाड उपस्थित होत्या. कार्यक्रमासाठी विजया बारी, अलका बारी यांनी यशस्वितेसाठी परीश्रम घेतले.
@@AUTHORINFO_V1@@