भडगावात सी.एम. चषकअंतर्गत खो-खो स्पर्धा उत्साहात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Dec-2018
Total Views |

 मुलींनी गाजवले मैदान

 
 
भडगाव : 
 
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून भाजपा युवा मोर्चा यांच्या पुढाकाराने पाचोरा मतदारसंघात सुरू असलेल्या सी.एम. चषकअंतर्गत खो-खो स्पर्धा आज भडगाव येथे न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर उत्साहात झाल्यात.
 
 
स्पर्धेचे उद्घाटन भाजयुमो जिल्हाध्यक्ष अमोल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अभियान संयोजक गोविंद शेलार, युवा मोर्चा भडगाव तालुकाध्यक्ष नितीन महाजन, पाचोरा तालुकाध्यक्ष गणेश पाटील हे उपस्थित होते.याप्रसंगी पंच म्हणून प्रा. दिनेश तांदळे, प्रेमचंद चौधरी, विकार शेख, विकास कोळी यांनी काम पाहिले.
 
 
खो-खो स्पर्धेत वय 16 वरील मुलांच्या गटात भडगाव येथील समर्थ स्पोर्ट्स क्लब विजयी झाले तर यारी दोस्ती ग्रुप शिंदाड ता.पाचोरा हे उपविजयी ठरले. तर मुलींच्या गटात लय भारी खो-खो क्लब शिंदाड ता. पाचोरा विजयी झालेत तर समर्थ क्लब उपविजयी ठरले.
यांनी घेतले परिश्रम
 
 
स्पर्धेचे प्रायोजकत्व राज्य परिषद सदस्य डी. एम. पाटील यांनी स्वीकारले होते. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी खो-खो संयोजक प्रमोद पाटील, ज्ञानेश्वर भोसले, निलेश महाजन, शेखर बच्छाव, मनोहर चौधरी, मनोहर पाटील, सचिन पाटील, पंकज भोई, वसंत वाघ, शुभम सुराणा, अजय कोळी, प्रदीप कोळी, भुरा कोळी यांनी परिश्रम घेतले.
@@AUTHORINFO_V1@@