राहुल गांधींनी जाहीर माफी मागावी : अमित शाह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Dec-2018
Total Views |


 


नवी दिल्ली : राफेल करार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने क्लीन चिट दिल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी राहुल गांधींना धारेवर धरले. “राहुल गांधी यांनी राफेलच्या मुद्द्यावरून देशाची दिशाभूल केली आहे. त्यांनी देशाची माफी मागितली पाहिजे आणि राफेल प्रकरणातील त्यांचा माहितीचा स्त्रोत जाहीर करावा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातून सत्याचा विजय झाला आहे. राहुल गांधी यांनी काँग्रेसला फायदा पोहोचवण्यासाठीच राफेलवरून राजकारण केले आहे.” असे शब्दात भाजपा अध्यक्ष अमित शाहांनी सुनावले. न्यायालयाच्या निर्णयानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदमध्ये ते बोलत होते.

 

“देशाच्या चौकीदारापासून भीती होती म्हणूच 'चौकीदार चोर है', 'चौकीदार चोर है' अशी बोंब ठोकण्यात आली, तरीही सूर्यावर कितीही चिखलफेक केली तरी त्याचे तेज कमी होत नाही हे राहुल गांधींनी लक्षात ठेवावे. तसेच यापुढे भविष्यात त्यांनी असे बालिशपणाचे आरोप करु नये.” असा सल्ला देखील अमित शाहांनी दिला आहे. “काँग्रेस एका काल्पनिक विश्वात रमली असून त्या विश्वात सत्य आणि न्यायाला स्थानच नाही. प्रश्नही काँग्रेसकडून उपस्थित केला जातो, वकील पण तेच असतात आणि न्यायाधीशही तेच असतात. यापुढे भविष्यात त्यांनी असे बालिशपणाचे आरोप करु नये.” असा टोला त्यांनी लगावला.

 
 
 

विरोधकांनी राफेलप्रकरणी ऑफसेट भागीदारीवरूनही गोंधळ घातला. मात्र न्यायालयाने हा मुद्दाही निकाली काढला आहे. या व्यवहारात कुणालाही आर्थिक फायदा पोहोचवण्याचा हेतू नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. याशिवाय प्रसारमाध्यमातील माहितीच्या आधारे आणि कपोलकल्पित आधारावर निर्णय देऊ शकत नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.” असेही अमित शाह यांनी सांगितले. याशिवाय “राहुल यांनी राफेलवरून केंद्रावर सतत टीका केली. त्यांच्याकडे पुरावे होते तर त्यांनी न्यायालयात याचिका का दाखल केली नाही? ते सुनावणीपासून दूर का राहिले?” असा सवालही त्यांनी केला.

 

संबंधित बातमीसाठी क्लिक करा...

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@