पायलट यांची मनधरणी, गहलोत मुख्यमंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Dec-2018
Total Views |
 
 

नवी दिल्ली : मध्यप्रदेश विधानसभा निवडणूकांनंतर मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटल्यानंतर राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाचा पेच सुटण्याची शक्यता आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, अशोक गहलोत यांच्या नावावर हायकमांडने शिक्कामोर्तब केले आहे. पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली जाणार आहे. वसुंधरा राजे यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारला पायउतार करण्यात काँग्रेस यशस्वी ठरली. प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट आणि काँग्रेस नेते अशोक गहलोत या दोघांत चुरस होती. काँग्रेस सरचिटणीस आणि राजस्थानचे प्रभारी अविनाश पांडे यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत आमदारांची मते जाणून घेण्यात आली. त्याबाबतचा अहवाल पांडे काँग्रेस अध्यक्षांसमोर मांडला.

 

हायकमांड कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अशोक गेहलोत गेल्या चार दशकांपासून राजकारणात सक्रिय आहे. देशपातळीवर नेतृत्व करणाऱ्या काँग्रेसच्या पहिल्या फळीतले नेते गहलोत मानले जातात.

 

वडिलांच्या राजकारणाचा वारसा जपत सचिन पायलट राजकारणात सक्रिय झाले. २००४ मध्ये दौसा मतदारसंघातून ते निवडून गेले होते. राजकीय कारकीर्द चढत्या क्रमाने बहरत गेली. मनमोहन सरकारच्या काळात पायलट यांनी अजमेर मतदारसंघात विकासाची कामे, केंद्रीय विद्यापीठ, रेल्वे, किसानगड विमानतळाची उभारणी केली होती.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@