अतिक्रमणावर प्रशासनाचा हातोडा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Dec-2018
Total Views |

 
 
जळगाव : 
 
शहरात विविध ठिकाणी गुरुवारी सकाळपासून प्रशासनाने अतिक्रमण काढण्यास सुरुवात करून अनेक दुकाने जमीनदोस्त केली. शहरात पाच पथकाद्वारे ही कारवाई करण्यात आली असून त्यासाठी चौकाचौकात पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. दरम्यान किरकोळ वाद वगळता अतिक्रमण सुरुळीत काढण्यात आले. शुक्रवारीही कारवाई सुरु राहणार आहे.
 
 
यावेळी मनपाचे आयुक्त चंद्रकांत डांगे, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, उपआयुक्त चंद्रकांत खोसे, लक्ष्मीकांत कहार यांच्यासह मनपा आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते.
 
 
दरम्यान, शहरात विविध शुक्रवारी आयुक्त चंद्रकांत डांगे, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्यासह मनपा आणि पोलीस अधिकार्‍यांनी अतिक्रमणाची मोजणी करून रुग्णालय, बँक, इमारती क्षेत्रात आवश्यक त्या खुणा केल्या होत्या.
 
 
तसेच सूचना आणि नोटिसाही दुकान व्यावसायिकांना देण्यात आल्या होत्या. दिवसेंदिवस शहरात अतिक्रमणात वाढ होत आहे.
सकाळी कोर्ट चौक, अ‍ॅक्सिस बँक, गोविंदा रिक्षा स्टॉप, घाणेकर चौक, चौबे चौक, सुभाष चौक, बेंडाळे चौक, जिल्हा रुग्णालय परिसर, पांडे चौकातील अतिक्रमण विभागाने कारवाई केली.
 
 
कारवाईच्या नियोजनासाठी बुधवारी सायंकाळपासून प्रशासनाकडून शहरात कारवाई सुरू असताना अनेक दुकानदारांनी दुकानासमोरील अतिक्रमण स्वतः काढण्यात आले. सायंकाळी 6.30 पर्यंत अतिक्रमण काढण्यातचे काम सुरु होते.
 
आजही कारवाई
 
 
शहरातील अतिक्रमण निर्मूलनासाठी प्रशासनाने कंबर कसली असून शुक्रवारी सकाळपासून अतिक्रमण काढण्यास सुरुवात होणार आहे.
 
 
त्यात शहरातील बेंडाळे चौक ते स्वातंत्र्य चौकातील रस्त्यावर कारवाई होणार असून तहसील कार्यालयाचाही त्यात समावेश आहे. शहरातील रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याचा प्रशासनाचा उद्देश आहे, असे आयुक्त डांगे यांनी सांगितले.
 
 
कारवाईत कोणत्याही लोकप्रतिनिधीचा सहभाग नाही - आयुक्त
 
 

 
अतिक्रमण कारवाईत कोणत्याही लोकप्रतिनिधीचा सहभाग नसून प्रशासन नियमानुसारचे कारवाई करीत आहे. भूसंपादनाचा ठराव संपला तेव्हाच विषय संपला होता, असे आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी बोलताना सांगितले.
 
 
दरम्यान, औरंगाबाद न्यायालयात सेके्रटरी ऑडिटमध्येही चर्चा होऊन त्या बैठकीत जळगाव न्यायालयाजवळील दुकानांमुळे न्यायालयाला सुरक्षेचा धोका निर्माण होऊ शकतो, असे सांगण्यात आले होते.
 
 
तसेच रस्ते अतिक्रमणमुक्त व्हावे, यासाठी कुठल्याही आदेशाची आवश्यकता नसते. दिवाळीपूर्वीच पोलीस बंदोबस्त मागविण्यात आलेेला होता. कारवाई ही सर्वसमावेश असून त्यात कुठलाही भेदभाव होत नाही, असेही त्यांनी सांगितले.
कोर्ट चौकात तवाणपूर्व शांतता
 
 
सकाळी प्रशासनाकडून अतिक्रम काढण्यास सुरुवात झाली. कोर्टास लागून असलेल्या दुकानांवर कारवाई केली. दरम्यान दुकानदारांकडून कारवाईचा विरोध करण्यात येऊन प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त करण्यात आला.
 
 
काही दुकानांवर दगडफेक करण्यात आली. पोलिसांना सौम्य लाठीमार करत अनेक दुकानारांना अटक करण्यात आली आहे.
चौकाचौकात वाहतुकीची कोंडी
 
 
शहरातील चौकाचौकात सुरू असलेल्या अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई दुपारपर्यंत सुरू होती. अनेक रस्त्यावर कारवाईसाठी पोलिसांनी एक रस्ता बंद करण्यात आल्याने काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती.
 
 
एकाच वेळी झालेल्या कारवाईत व्यावसायिकांचा गोंधळ उडाला. सुभाष चौकात हॉकर्स यांच्यावर कारवाई करण्यात येऊन त्यांचा माल जप्त मनपाकडून जप्त करण्यात आला.
दुकानदारांचे कुटुंंबं उघड्यावर...
 
 

 
 
कोर्टाला लागून 10 ते 15 दुकाने अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी अस्तित्वात होते. येथे चहा, सलून, नाश्ता, झेरॉक्स, वेंडर आदींची दुकाने होती. त्या दुकानांद्वारे त्या कुटुंबांचा उदरनिर्वाह चालत होता.
 
 
अतिक्रमणाच्या कारवाईत दुकाने जमीनदोस्त झाल्याने दुकानांचे कुटुंंब उघड्यावर येणार आहे. दरम्यान, कारवाई करीत असताना काही दुकानदारांना अश्रू अनावर झाले. मनपा अधिकार्‍यांना दुकानदारांकडून दर महिन्याला पैसे देण्यात येतात, असा आरोपही यावेळी करण्यात आला.
@@AUTHORINFO_V1@@