स्त्रीरोग संघटनेतर्फे चर्चासत्रात 250 डॉक्टरांचा सहभाग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Dec-2018
Total Views |

जळगाव : 
 
 
येथील प्रेसिडेंट कॉटेजमध्ये 9 रोजी जळगाव स्त्रीरोगतज्ज्ञ संघटनेतर्फे ‘मेडिको लिगल इश्यू इन प्रॅक्टिस’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
 
चर्चासत्रात मुंबई, औरंगाबाद, अमरावती येथून सुमारे 250 डॉक्टर सहभागी झाले होते.प्रमुख पाहुणे जिल्हा शल्यचिकित्स डॉ. एन.एस.चव्हाण, पद्मश्री अ‍ॅड. उज्ज्वल निकम हे होते.
 
 
डॉक्टरांवर होणारे हल्ले, ‘क्रीमिनल लाएबिलिटी’ या विषयावर बोलताना अ‍ॅड. निकम म्हणाले की, आजच्या काळात फॅमिली डॉक्टर ही संवेदना नाहीशी झाली आहे. स्पेशालिस्ट डॉक्टर्स सर्वत्र उपलब्ध आहेत.
 
आतंकवाद्यांशी संवाद साधून त्यांच्या नकळत खरी माहिती कशी काढून घेतली जाते, याबाबत त्यांनी उदाहरण सांगितले.
डॉक्टरांनी रुग्णाची मानसिकता सांभाळून आजारावर उपचार केले तर तो रुग्ण पूर्णपणे बरा होतो. खरा डॉक्टर हा आजार बरा करत नाही तर रुग्णही बरा करतो.
 
 
तसेच महाराष्ट्र मेडिको लिगल कमिटीचे चेअरपर्सन डॉ. अलका कुथे, औरंगाबादचे डॉ. माने, डॉ. खेडकर, मुंबईचे डॉ. वाणी, डॉ. संतोष जयभये यांनी मार्गदर्शन केले.
 
 
अध्यक्षा डॉ. सुजाता महाजन यांच्या हस्ते दीपप्रज्वलन होऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी सेके्रटरी डॉ. सरिता पाटील, डॉ. अंजली भिरुड, डॉ. वर्षा पाटील, डॉ. वैशाली चौधरी, डॉ. अशिष वाघ, डॉ. चांडक, डॉ. प्रिया महाजन आदी उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@