मराठा जात प्रमाणपत्र वाटपास सुरूवात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Dec-2018
Total Views |
 
 

मुंबई : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मराठा समाजासाठी १६ टक्के आरक्षणाचा कायदा करण्यात आला. यानंतर आता पुढील प्रक्रियेला वेग आला असून मराठा जात प्रमाणपत्र वाटपास सुरूवात करण्यात आली आहे. मराठा जात प्रमाणपत्र घेण्याची संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे. गुरूवारी लातूरमधील अहमदपूरमध्ये पहिले मराठा जात प्रमाणपत्र देण्यात आले. मराठा जात प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

 

कशी आहे प्रक्रिया

 

ऑनलाईन पद्धतीने हे जात प्रमाणपत्र देण्यात येणार असून सेतू सुविधा केंद्रांमध्ये यासाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज केल्यानंतर जवळपास १० दिवसांमध्ये संबंधितांना जात प्रमाणपत्र देण्यात येईल.

 
 

आवश्यक कागदपत्रे

 

जात प्रमाणपत्र हवे असलेल्या व्यक्तीचा शाळा सोडल्याचा दाखला देणे बंधनकारक आहे. तसेच यामध्ये हिंदू मराठा जातीचा उल्लेखही आवश्यक आहे. शाळा सोडल्याचा दाखला नसल्यास जन्मतारीख आणि जातीचा उल्लेख असलेले बोनाफाईड सर्टिफिकेट द्यावा लागणार आहे. १३ ऑक्टोबर १९६७ पूर्वी जन्म झाल्यास जातीचा पुरावा द्यावा लागणार आहे. तसेच यासोबत हिंदू मराठा उल्लेख असेला शाळेचा दाखला, जन्म-मृत्यूची नोंद असलेला महसूल अभिलेखातील पुरावा, शासकीय किंवा निमशासकीय नोकरीचा जातीची नोंद साक्षांकित केलेला उतारा, समाज कल्याण खात्याकडील जात पडताळणी समितीने वैध ठरविलेले जातीबाबत प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक कागदपत्र सोबत जोडावे लागणार आहे. तसेच वडिलांचा जातीचा दाखला नसल्यास शपथपत्र देणे बंधनकारक असणार आहे. यासोबतच महसूल पत्र, रहिवासी प्रमाणपत्र, रेशनकार्ड, आधारकार्ड आणि एक फोटोदेखील द्यावा लागणार आहे. अर्ज केल्यानंतर एक टोकन क्रमांक देणअयात येणआर असून कोणत्या दिवशी जातीचा दाखला मिळेल ती तारीख सांगण्यात येईल.


माहितीच्या
महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@