कॉंग्रेसला मल्ल्याच्या शुभेच्छा; नेटकऱ्यांनी आपटले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Dec-2018
Total Views |
 
 

नवी दिल्ली : राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या जनतेने कॉंग्रेसला कौल दिल्यानंतर आता सत्ता स्थापनेला वेग येत आहे. दोन्ही राज्यांमध्ये युवा नेत्यांची नावे चर्चेत आहेत. मध्यप्रदेशमध्ये आता ज्योतिराज सिंधिया सचिन पायलट यांची नावे आघाडीवर आहेत. मात्र, कमलनाथ आणि अशोक गहलोत यांनाही अनुभवामुळे प्राध्यान दिले जाऊ शकते, अशी शक्यता आहे. मात्र, बॅंकांना कोट्यवधींचा चुना लाऊन गेलेला विजय मल्ल्याने सचिन पायलट आणि सिंधिया यांचे अभिनंदन केले. मात्र, नेहमीप्रमाणे ट्विटरवर ट्रोलकरांनी मल्ल्याला चांगलेच फैलावर घेतले.

 
 
 

मल्ल्याला ट्रोल करत भारतात परत ये, गरीबांचे पैसे परत कर, शिक्षा भोगून कायदा युव्यवस्थेचे पालन कर, असे म्हटले आहे. नवीन वशिष्ठ यांनी ट्विट करत म्हटले की, तुम्ही भारतात या तुम्हाला इथे सुरक्षित जागा तयार आहे. तुमच्यासाठीच ही तीन राज्ये आहेत. विशाल यांनी ट्विट करत ये रिश्ता क्या केहेलाता है म्हटले आहे

 
 
 

दरम्यान विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असून आता मुंबईतील भायखळा तुरुंगातील बराक क्रमांक बारामध्ये त्याला ठेवले जाणार असल्याचे तुरुंग प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

  
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@